पब,डिस्को,बारना सवलती मात्र गणेशोत्सवावर बंधने का?

आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे यंदाही गणेशोत्सवर निर्बंध लावण्यात आले आहे. गणेशोत्सवावर लावण्यात आलेल्या निर्बंधांवरुन राज्यातील गणेश मंडळांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. विरोधकांनीही राज्य सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे. तसेच जर कोरोनाच्या प्रादुर्भावात पब, डिस्को, बारना परवानगी देण्यात आली आहे तर गणेशोत्सव बंदिवासात का असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

राज्यात पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद मात्र गणेशोत्सव बंदिवासात असा बंदीशाळा राज्याची पुर्ण केली आहे. रोज नवीन निर्बंध टाकले जात आहेत आता गणेशोत्सवावरही चर्चा न करत बंधने घातले आहेत. नियमावली काढताना सर्वसमावेशक चर्चा राज्य सरकारनं केली नाही. यामधील निर्देशही अजब आहेत. विसर्जनाच्या आधी जी आरती केली जाते ती घरीच करा असे म्हटलं आहे. गणेशोत्सव काय करायचा म्हणून करायचा का? राज्य सरकारने पुन्हा विचार केला पाहिजे. डिस्को पब आणि बारला जर परवानगी असेल तर गणेशोत्सवावर निर्बंध का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

दरम्यान पुढे म्हटलं आहे की, राज्य सरकारने या मार्गदर्शक सुचनांबाबत पुनर्विचार केला पाहिजे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतर ठेवणे वगैरे ठीक आहे परंतु किती फुटाच्या उंचीवरुन काय कोरोनाचा संबंध आहे. असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here