धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) – उप जिल्हा रुग्णालयास टाटा कंपणी कडून १ कोटीचे ऑक्सीजन निर्मीती प्लॉन्ट उभारण्याचे काम सुरू झाले आहे .या ऑक्सीजन निर्मीती प्लॉन्टसाठी उप जिल्हा रुग्णालयात फाऊंडेशन व शेडचे काम सुरू करण्यात आले आहे ऑक्सीजन मशीन ऑक्सेयर कंपनी चेन्नई येथून उप जिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे .
या प्लॉन्ट मधून हवे पासुन दर मिनिटाला ६०० लिटर ऑक्सीजन निर्मीती होणार आहे . यामुळे परंडा तालूक्यातील रुग्णांचा ऑक्सीजन चा प्रश्न मिटला आहे .या प्लॉन्ट मधून ९३ टक्के आक्सीजनची निर्मीती होणार असुन दर मिनटाला ६०० लिटर ऑक्सीजन निर्मीती होणार असल्याची माहिती ऑक्सेयर कंपणी चेन्नई चे इंजिनियर बसवराज टेक्नीशियन हर्षद सोनगिरे , सर्वेस इंजिनियर सुभाष तलवार यांनी दिली . या वेळी उप जिल्हा रुग्णालयाचे डॉ पठाण उपस्थित होते .
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परंडा तालूक्यात शेकडो लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ऑक्सीजनची आवश्यकता पडली होती ऑक्सीजन चा तुटवडा झाल्याने ऑक्सीजन पुरवठा करण्या साठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली होती .या ऑक्सीजन निर्मिती प्लॉन्ट मुळे परंडा तालूक्यातील रुग्णा साठी मोठा दिलासा मिळाला आहे .






