मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जाणारे ज्येष्ठ अभिनेता नसीरुद्दीन शाह यांची तब्येत फारशी चांगली नाही. दोन दिवसांपूर्वी नसीरुद्दीन शाह यांना मुंबईतील इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नसीरुद्दीन यांना निमोनिया झाला आहे. इतर तपासण्यांनंतर त्यांच्या फुफ्फुसात काही ठिपकेही आढळले. नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत पत्नी रत्ना पाठक आणि त्यांची मुलंही इस्पितळात उपस्थित असतात.
Ace actor #NaseeruddinShah has been hospitalised. “He was brought in for pneumonia. There was a patch found in his lungs and it became necessary for him to be hospitalised immediately,” his manager has said. pic.twitter.com/OaIs1Jf4dX
— Filmfare (@filmfare) June 30, 2021
नसीरुद्दीन शाह यांच्या मॅनेजरने एका वृत्तपत्राला नसीरुद्दीन शाह यांना इस्पितळात दाखल केल्याची बातमी खरी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, ‘दोन दिवसांपासून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार होत आहेत. न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या फुफ्फुसात एक ठिपका आढळून आला आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि उपचार अजूनही सुरू आहेत.’






