दि. १ जुलै राशिभविष्य : मीन राशीतील चंद्राचे भ्रमणाचा या राशींना होईल फायदा

    rashibhavishya

    मेष
    व्ययस्थानातील चंद्र आज दिवस अनुकूल नाही हे सांगतो आहे. मीन चंद्र, मंगळ शुभ योगात असून आर्थिक बाबतीत यश मिळवून देतील. प्रकृती जरा नरम राहील. दिवस मध्यम .

    वृषभ
    आज मित्र मैत्रिणींसोबत आनंदने दिवस घालवा. लाभ होतील. तुमच्या बुद्धी व धैर्याने परिस्थितीत बदल होईल. नवीन परिचय होतील. दिवस उत्तम आहे.

    मिथुन
    आज एखादी महत्त्वाची मीटिंग होईल. त्यात तुम्ही सर्वांच्या नजरेस याल. तुमचे काम आणि बुद्धी सर्वाना चकित करेल. राशीतील सूर्य तेज देईल. प्रसन्न दिवस.

    कर्क
    महत्त्वाची बातमी, भाग्यकारक घटना असा हा आनंदी दिवस आहे. आर्थिक दृष्टय़ा दिवस उत्तम आहे. राशीतील मंगळ शुक्राचे प्रभावक्षेत्र स्त्री वर्गाकडून लाभ दर्शवतो. दिवस उत्तम .

    सिंह
    आज अष्टमात चंद्र ,व्ययात मंगळ शुक्राचे भ्रमण सांभाळून रहा असे सुचवत आहे. कोणाशीही वाद करू नका. व्यवसायधंद्यात आज काही बदल नको. महत्त्वाचा निर्णय टाळा. दिवस मध्यम.

    कन्या
    आज जरा बाहेर फिरून येण्याचा मूड होईल. दोघे मिळून काही खरेदी कराल. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर केली जाईल. व्यवसाय उत्तम राहील. शुक्र लाभ देण्यास अनुकूल आहे.

    तुला
    षष्ठ चंद्र, आराम, मनोरंजन, नातेवाईकांना भेट किंवा फोन असे दर्शवतो आहे. दशमातील मंगळ चंद्र नवपंचम योग करीत आहेत. दिवस शुभ आर्थिक बाजू चांगली राहील.

    वृश्चिक
    महत्त्वाचा पत्र व्यवहार, जन संपर्क होईल. संतती ला वेळ द्यावा लागेल. जरा प्रकृतीला जपावे. मित्र मैत्रिणींसोबत दिवस आनंदात घालवा. आर्थिक बाजू ठीक राहील. दिवस शुभ.

    धनु
    आज गृहसौख्य भरपूर लाभणार आहे. घरासाठी काही नवीन खरेदी होईल. प्रकृती थोडी नरम राहील. काळजी घ्या. घरीच आराम करावा असे वाटेल. दिवस उत्तम.

    मकर
    तुम्ही आज जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल. तृतीय चंद्र आज प्रवास, मौजमजेसाठी खर्च असे दर्शवतो. बहीण भावंंडं भेट देतील. तुमचा दिवस उत्तम जाईल.

    कुंभ
    आज चा दिवस आर्थिक भरभराट, कुटुंबाचे भक्कम पाठबळ असा आहे. व्यावसायिक निर्णय घ्यायचे असतील तर दिवस शुभ. शत्रू टिकाव धरणार नाहीत उत्तम दिवस.

    मीन
    आज राशीतून होणारे चंद्राचे भ्रमण मंगळ शुक्र नवपंचम योग करीत आहे.कधीतरी स्वतःचा विचार करणे गरजेचे असते. आज स्वतः साठी वेळ काढा. काही मित्र मैत्रिणींना भेटा.धार्मिक कार्य होईल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here