वाढदिवशी लेकीने स्वतःच्या पगारातून आणलेल्या केकचे सोशल मिडीयावर कौतुक
मुंबई (संपादक सुनिल पाटील) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस 30 जून रोजी साजरा झाला. आपल्या कुटुंबीयांसमेवत घरीच साधेपणाने साजरा केला. या वाढदिवसासाठी सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिने तिच्या पगारातील पैशाने केक आणला होता. लेकीनं दिलेलं हे गिफ्ट आईला भावूक करुन गेलंय. त्यामुळेच, सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयावरून या भेटीचं कौतुक करत आपल्या लेकीविषयी अभिमान व्यक्त केला आहे.
आई-बाबा आणि कुटुंबीयांच्या सोबतीने वाढदिवसाचा हा क्षण साजरा केला. हे क्षण अनमोल आहेत. pic.twitter.com/lfViwPxqrc
— Supriya Sule (@supriya_sule) June 30, 2021
सुप्रिया सुळे यांनी 30 जून रोजी वाढदिवस साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘आई-बाबा आणि कुटुंबीयांच्या सोबतीने वाढदिवस साजरा केला, हे क्षण अनमोल आहेत’, असं यावेळी सुप्रिया सुळेंनी लिहिलं होतं. त्यानंतर, आज केकचा स्वतंत्रपणे फोटो शेअर करत खासदार असलेल्या आईने लेकीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
https://www.facebook.com/supriyasule/posts/4369165473115416
या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘हा केक माझ्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट… कालपरवापर्यंत अवतीभवती वावरणारी माझी लेक रेवती आता नोकरी करते. तिने तिच्या पगारातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून हा केक आणला आणि आईचं मन लेकीच्या कौतुकानं सुखावलं. मुलांचं यश आई-वडीलांना आपल्या यशापेक्षा नेहमीच मोठं वाटतं’, अशा भावनिक शब्दात सुप्रिया सुळेंनी आनंद शेअर केला आहे.
हा केक माझ्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट… कालपरवापर्यंत अवतीभवती वावरणारी माझी लेक रेवती आता नोकरी करते. तिने तिच्या पगारातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून हा केक आणला आणि आईचं मन लेकीच्या कौतुकानं सुखावलं. मुलांचं यश आई-वडीलांना आपल्या यशापेक्षा नेहमीच मोठं वाटतं. pic.twitter.com/yGYpu2HFsE
— Supriya Sule (@supriya_sule) July 1, 2021






