अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांच्या ‘ईडी’ कोठडीत वाढ

anil-deshmukh
file photo

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांच्या ईडी कोठडीत स्पेशल पीएमएलए कोर्टाने आणखी पाच दिवस वाढ केली आहे. त्यामुळे आता या दोघांना ६ जुलैपर्यंत ईडी कोठडी असणार आहे. या कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना न्यायालयाने १ जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटींच्या आरोपांचा तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २५ जून रोजी दिवसभर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच त्यानंतर त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here