समृद्ध जीवन पतसंस्थेवर सीआयडीचे छापे

पुणे (प्रतिनिधी सुनील भोसले) : समृद्ध जीवन पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) पथकाने गुरुवारी औंध परिसरातील भूमकर चौक, नऱ्हे-आंबेगाव, उस्मानाबाद याठिकाणी कार्यालय, फ्लॅट आदी ठिकाणी छापेमारी केली. यात महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सीआयडीचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिली.

समृद्ध जीवनचे संस्थापक महेश मोतेवार यांची पत्नी वैशाली मोतेवर हिच्याकडे सीआयडीने चौकशी केली, त्यावेळी तिने कागदपत्रांबाबत माहिती दिली. अनेक गुंतवणूकदारांना समृद्ध जीवनने पैसे परत केले असून अद्याप काही ठेवीदारांना पैसे द्यावयाचे असून त्याबाबतचे कागदपत्रे नेमके कुठे आहेत, याची माहिती तिने सीआयडीला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर गुरुवारी सीआयडीचे पथकाने पुणे व उस्मानाबादमध्ये तीन ते चार ठिकाणी छापे टाकले. यावेळी फॉरेन्सिक ऑडिटचे पथकही सीआयडीच्या मदतीस होते.

समृध्द्ध जीवन फूडस इंडिया लि व समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को-ऑप सोसायटी कंपनी अंतर्गत पशुधन विक्री, संगोपन व खरेदी आणि आकर्षक परतावा देणाऱ्या योजना सुरू केल्या होत्या. 12 टक्‍के दराने ठेवींवर परतावा मिळेल, असे सांगून एजंटही नेमले. याद्वारे 377 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा केला. याप्रकरणी आतापर्यंत सुमारे 25 आरोपींना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here