जम्मू (प्रतिनिधी राजन चौधरी) : जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी रात्री उशिरापासून दहशतवादी आणि सुरक्षादलामध्ये चकमक सुरू आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलानं या भागाला घेराव घातला होता. आजच्या चकमकीत सुरक्षा दलानं तीन दहशतवाद्यांना टिपलंय तर सुरक्षादलातील एक जवानही या चकमकीत शहीद झालाय. अद्याप ही चकमक संपलेली नाही. दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरू आहे.
जम्मू-कश्मीर: पुलवामा में चल रही मुठभेड़ में लश्कर-ए-तैयबा के 3 आतंकवादी मारे गए। ऑपरेशन अभी चल रहा है। (तस्वीरें वर्तमान समय के अनुसार नहीं हैं) pic.twitter.com/pyIqDNrUld
— ANI_HindiNews (@AHindinews) July 2, 2021
काश्मीर विभागाचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामाच्या हाजिन राजपोरा भागात ही चकमक सुरू आहे. या चकमकीत ठार झालेले तीघेही जण लष्कर ए तोयबाशी संबंधित आहेत.
सुरक्षादलानं चारही बाजुंनी घेरल्यानंतर दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, दहशतवाद्यांकडून सुरक्षादलावर गोळीबार सुरू करण्यात आला. याला सुरक्षादलानंही चोख प्रत्यूत्तर दिलं. गोळीबारा दरम्यान एका जवानही गोळी लागल्यानं गंभीर जखमी झाला. सहकारी जवानांनी त्याला तातडीनं रुग्णालयात हलवलं परंतु, उपचारादरम्यान या जवानाचा मृत्यू झाला. शहीद जवानांच नाव हवालदार काशी राव असल्याचं समजतंय.






