अमिताभ बच्चनसोबत अग्निपथ आणि खुदा गवाह या चित्रपटांमध्ये केले होते काम
मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथ आणि खुदा गवाह या चित्रपटांमध्ये काम केलेले बॉलिवूड अभिनेते अरविंद राठौड यांचे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांनी नाटकातून अभिनय करिअरची सुरुवात केली अभिनेते अरविंद राठौड यांनी खूप कष्ट घेऊन गुजराती इंडस्ट्रीमध्ये आपली प्रतिमा निर्माण केली.
१९७० मध्ये त्यांनी गुजराती आणि हिंदी चित्रपटंमध्ये पाऊल ठेवलं. त्यांचा पहिला चित्रपट १९७६ मध्ये बाबा रामदेवपीर होता. त्याशिवाय त्यांनी राजा गोपीचंद, शेतल तारा ऊंडा पाणी यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
अरविंद यांनी जवळपास २५० चित्रपटांमध्ये काम केले होते. यादरम्यान, त्यांनी अनेक हिट हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केले. ‘अग्निपथ’, ‘द लेडी किलर’, ‘खुदा गवाह’ यसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. ‘भादर तारा वोता पानी’, ‘ सोन कंसारी’, ‘गंगा सती’, ‘मां खोदल तारो खामकारो’ यासारख्या गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.






