शिवसेना दक्षिण मुंबई रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई(कुलाबा) (प्रमिला जाधव) – शिवसेना दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मांडवी शिवसेना शाखा, मस्जिद बंदर येथे नुकतेच सामाजिक अंतर ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये विभागातील शिवसैनिकांनी, नागरिकांनी आणि विविध मंडळाच्या सभासदांनी रक्तदान करून सहभाग घेतला. या शिबिरांमधून तब्बल 200 पेक्षा जास्त बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले.
या शिबिरात विभागातील महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान केले. या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रमाणपत्र आणि आणि छत्रीही भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. आम्ही सामाजिक बांधिलकी जपून या कोरोना वैश्विक महामारीमुळे रक्ताची कमतरता असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तसेच लोकांना रक्तदानाचे महत्त्व समजावे आणि त्यातून जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही हे रक्तदान शिबीर आयोजित केले असल्याची माहिती विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ आणि नगरसेविका सुजाता सानप यांनी दिली. या शिबिराला विभागातील अनेक मान्यवर मंडळींनी आणि सामाजिक संस्थांनी भेट देऊन कौतुक केले.या शिबिराला दक्षिण मुंबई खासदार अरविंदजी सावंत, शिवसेना उपनेते श्री रवींद्रजी मिर्लेकर, माजी उपविभाग प्रमुख श्री विकास मयेकर, महिला उपविभाग संघटक सौ बीना दौंडकर यांनी भेट देऊन शिबिराचे कौतुक केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सह समन्वयक श्री विक्रम धोत्रे, शाखाप्रमुख श्री जयवंत नाईक, श्री स्वप्नील कोळी, शाखा संघटिका सौ सुरेखा हाडोळे, युवासेना विभाग अधिकारी श्री प्रथमेश सकपाळ, भाविसे विभाग संघटक श्री आशिष हातणकर , भाविसे उपविभाग संघटक श्री मनीष देसाई सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकानी विशेष मेहनत घेतली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here