महाकवी कालीदास दिनी होणार राज्य स्तरीय ऑनलाइन अहिरानी कवी संमेलन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : आपल्या संस्कृतीशी नाते सांगणार्‍या माय अहिराणीचा जागर व्हावा म्हणुन महाकवी कालीदास यांच्या स्मृतीदिना निमित्त राज्य स्तरीयअहिराणी कवी संमेलनचे आयोजन उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलीत जागतिक अहिरानी भाषा संवर्धन समिती यांचे विद्यमाने दिनांक ११ जुलै २०२१ ला संध्याकाळी ५.०० वाजता ऑनलाइन संपन्न होणार आहे, या संमेलनात जास्तीत जास्त कविनी सहभागी होऊन अहिरानी मायचा जागर सर्वत्र करण्याची एक संधी असल्याचे उमखाविम अध्यक्ष विकास पाटील व कार्याध्यक्ष बापूसाहेब हटकर यांनी सांगितले.

खान्देशतील अहिरानी भाषेत विविध गुणांना चालना मिळावी,,जनमानसात अहिरानी बद्दलचा आत्मविश्वास वाढावा, मायबोलीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा हा या उद्देशाने हे संमेलन भरत आहे.असे. जाअ.भा.स.प.चे कार्याध्यक्ष बापूसाहेब पिंगळे व सहकार्याध्यक्ष डॉ. एस.के पाटील यांनी सांगितले.

या संमेलनाचे अध्यक्ष पद ज्येष्ठ आहिराणी कवी मा. श्री. रामदास वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात कायदे पंडीत मा.आ.श्री.शिशीरदादा हिरे हे उपस्थित राहणार आहेत. राज्य स्तरीय आहिराणी संमेलनसाठी कवींनी आपल्या कवितेचा ३ मिनिटांचा व्हिडीओ बनवून आयोजकांकडे पुढील whatsapp no. 9881142151 श्री. प्रमोद कुवर सर यांच्या कडे ४ जूलै २०२१ पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे..निवडसमिती अध्यक्ष श्री प्रकाश पाटील व सचिव श्री मोहन पाटील यांनी केले आहे.

कवीता संकलन/ निवड समीती : अध्यक्ष कवी प्रकाश पाटील-पिंगळवाडेकर, सचिव कवी मोहन पाटील- कवळीथकर, समन्वयक कवी देवदत्त बोरसे, सदस्य कवयित्री श्रीमती. लतिका चौधरी, कवी कैलास संतोष भामरे, कवी सुदाम महाजन, कवयत्री श्रीमती सुनीता पाटील यांची असून, जास्तीत जास्त कवींनी या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन ए जी पाटील,प्रा.प्रकाश माळी प्रमोद कुवर एम् के भामरे, दिपक पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here