मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : हिंदी चित्रपटसृष्टीत नाते जुळणे, विवाह होणे आणि ब्रेकअप होणे किंवा घटस्फोट होणे हे काही विशेष मानले जात नाही. अनेक अभिनेता – अभिनेत्रींच्या या बातम्या समोर येत असतात. आता एक नवीन बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आमिर खान आणि किरण राव यांचे १५ वर्षांचा संसार संपुष्टात आला आहे. दोघांनी एकमेकांच्या समहमतीने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे.
नक्कीच दोघांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. चाहत्यांनाही या दोघांच्या घटस्फोटाची बातमीने मोठा धक्काच बसला आहे. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री होती. एक कपल म्हणून सा-यांचे ते फेव्हरेट बनले होते. घटस्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे कारण समोर आलेले नाही. किरण रावसह आमिर खानचे दुसरे लग्न होते.घटस्फोट झाला असला तरी मुलाची काळजी दोघेही घेत राहतील. आयुष्याची नवीन सुरुवात करत आहोत. दोघेही आता पती पत्नीसारखे राहत नसलो तरी मैत्री कायम राहिल असे आमिर खानने सांगितले आहे.
२००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. प्रोफेशनल लाइफबाबत सांगायचं तर किरण सिने निर्माती, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्हसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. धोबी घाट या सिनेमाचं तिने दिग्दर्शनही केलं आहे. देशभरात दोघेही पाणी फाऊंडेशनसाठी काम करतात.






