अमळनेर (प्रतिनिधी) – आज रोजी कपिलेश्वर महादेव मंदिर येथे कोरोना सारख्या वैश्विक महामारीपासून संपूर्ण जगाचे रक्षण व्हावे तसेच कोरोना सारख्या संकटा समोर लढतांना कोरोना संसर्ग पासून बाधित झालेल्या मा.आ.स्मिताताई वाघ यांची प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी या साठी कपिलेश्वर महादेव मंदिर येथे रुद्रयाग विधी करण्यात आला या प्रसंगी कृ.उ.बाजार समिती संचालक पराग पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे उपस्थित होते. तसेच सुनील मांडे गुरुजी सारंग पाठक गुरुजी यांच्या मार्गदर्शनात रुद्रयाग विधी संपन्न झाला.








