ढवळे महाविद्यालयात मुलीनी मारली बाजी,पुढील ध्येय गाठणार

पुणे (पंढरी गायकवाड) – काल दहावीचा निकाल लागला असून अनेक विद्यार्थ्यांना व पालकांना उत्साह निर्माण होत आहे की कोणाला किती मार्क्स मिळाले आहेत,प्रत्येक शाळेतील शिक्षकांना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचा व महाविद्याल निकाल बघण्याची उत्सुकता असते, महाराष्ट्रमध्ये काल १० वि चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे, शिरपूर जैन येथिल कैलास कोंडबा तात्या ठवळे विद्यालय व श्री संत ओंकारगीर बाबा कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६.७२% टक्क्यांनी लागला आहे, मागील वर्षी ८४% टक्के निकाल जाहीर झाला होता परंतु या वर्षी १२% पर्सेन्टेज नि निकाल वाढला आहे यामध्ये विद्यार्थ्यांनि कमालीची टक्केवारी मिळवून महाविद्यालयाला सन्मान दिला आहे यामध्ये शिक्षक वर्ग सुद्धा वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक वाहुरवाघ सर यांनी सांगितले
कैलाश कोंडबा तात्या ठवळे महाविद्यालयातुन सर्वप्रथम श्रध्दा रमेश देशमुख हिने ५०० पैकी ४७५ मार्क मिळवून ९५% टक्के मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे,माधुरी किशोर इंगळे या विद्यार्थिनीने ५०० पैकी ४७१ मार्क घेऊन ९४.२०% टक्के प्राप्त करून दुसरा नंबर घेतला आहे, तर कल्याणी अरुण बोबडे विद्यार्थीनिने ५०० पैकी ४७९ मार्क मिळवून ९३.८० टक्के प्राप्त करून तिसरा नंबर मिळवला आहे, महाविद्यालयात मुलींनीच बाजी मारली आहे, या विद्यार्थीनी स्टार महाराष्ट्र न्यूज ला भविष्यात काय ध्येय आहे ते सांगितले, श्रद्धा ला सीए होऊन बँकिंग क्षेत्रात करिअर करायचंय अस तिने सांगितले असून माधुरी ला IPS ऑफिसर होऊन कायदा सुव्यवस्था टिकवून गुन्हेगारी वर आळा घालायचा आहे आणि कल्याणीला MBBS डॉक्टर होऊन गरजू रुग्णांना मदत करून आरोग्य चांगले ठेवायचे आहे अश्या या विद्यार्थ्यांनिणीचे ध्येय सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here