‘हमारे नाम से आग लग जाती है’

खासदार संजय राऊतांचं सूचक ट्विट

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक उलथापलथ होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते आशिष शेलार एकमेकांना भेटले. ही गुप्त भेट होती.

पण मीडियाच्या कॅमेऱ्यातून ती सुटली नाही. आता या भेटीवर शेलार आणि राऊत यांच्याकडून इन्कार केला जात आहे. पण संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, जहाँ हमारे नाम से आग लग जाती है।, असं राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आग कुणाला लागली? राऊतांविरोधात अफवा कोण पसरवत आहे? असा सवाल केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here