नाशिक (विशेष प्रतिनिधी तन्मय गांगुर्डे) – आयुर्वेद तज्ञांच्या मते कोरोना सारख्या संक्रमित आजारावर प्रतिकारशक्ती वाढविणे कामी आयुर्वेद उपचार पध्दती अत्यंत प्रभावशाली आहे. आयुर्वेद उपचार पध्दतीत नियमितता ही आवश्यक बाब आहे.कोरोना सारख्या महाभयंकर संक्रमित आजारात योग शास्त्रातील जलनेती प्रक्रिया ही देखील अत्यंत प्रभावशाली अशी उपचार पध्दती आहे. जलनेती ही योग शास्त्रामधील एक शुध्दी क्रीया आहे. यामध्ये जलनिती पात्राचा वापर केला जातो व हे पात्र बाजाराज सहजपणे उपलब्ध होउ शकते.
जलनेती क्रीयेमध्ये कोमट पाणी व सैंदव मिठाचा वापर केला जातो. या क्रियेमध्ये दोन जलपात्र भरुन कोमटपाणी लागते त्यातील एकजलपात्र डाव्या नाकपुडीसाठी व दुसरेजलपात्र उजव्या नाकपुडीसाठी लागते. यामध्ये कोमट पाणीच का घ्यावे तर थंड पाणी नाकामध्ये गेल्यास त्याची सनक बसु शकते ती सनक बसु नये याकरीता कोमट पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. व सैंदव मिठामध्ये (रससोशक) ऑस्मॅटीक प्रेशर असल्याने तो नाकातील सायनस मध्ये लपुन बसलेल्या व्हायरसला निष्क्रीय करतो व मारतो. कोमटपाण्यामुळे व्हायरस नाकामधील सायनसमधुन बाहेर टाकला जातो त्यामुळे व्हायरस फुफुसांपर्यंत पोहचु शकत नाही परीणामी आजाराचे संक्रमणास अटकाव होउन तो पुढे पसरत नाही. जलनेती क्रीया घरात राहणा-या व्यक्तीने दररोज एक वेळेस व बाहेर वावरणा-या व्यक्तीने दिवसातून 2 वेळेस करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध चांगल्याप्रकारे होउन आपण सुरक्षित राहू.

नाशिक शहरातील नागरीकांनी जलनेती ही क्रियाचे प्रात्याक्षिक समजुन घेण्यासाठी आम्ही उपक्रमाचे आयोजन करीत आहोत त्यात अनेक नागरिक सहभागी होत आहेत. प्रभाग क्र २८ मधील परिसरातील नागरिकांसाठी कोरोना पासून वाचण्यासाठी (जलनेती उपक्रम) गणपती मंदिर माउली लॉन्स समोर डिजिपी २ आयोजित करण्यात आला. उपस्थित नागरिकांना ओंकार खरे योग शिक्षक यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले व जलनेती पात्र यांचे देखील मोफत वाटप करण्यात आले.उपस्थित प्रसाद ठाकरे,जितेंद्र पाटील,तन्मय गांगुर्डे/पाटील,जॅकी ठाकरे,श्रेयस धात्रक,सागर जाधव,सौरभ खंबायत,सचिन भोर,दीपक देवरे,गोपाळ शिरोडे,प्रतीक बैरागी,किशन बैरागी,शरद पाटील इ. कार्यक्रमाचे आयोजन तन्मय गांगुर्डे यांनी केले.






