मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि अभिनेता टायगर श्रॉफची बहीण देखील रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. कृष्णादेखील त्याच्या प्रमाणेच फिटनेस फ्रीक आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच तिची मोठी फॅनफॉलोइंग ही आहे. तर आता तिने ही चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच कृष्णाने आपण चाहत्यांना एक सरप्राइज देणार असल्याचं म्हटलं होत. तर आता ते सरप्राइज समोर आलं आहे. तिने एका म्यूझिक व्हिडिओतून पदार्पण केलं आहे.
‘कीनी किनी वारी’ असं या अल्बमच नावं आहे. सोशल मीडिया वर या व्हिडिओ ला चांगला प्रतिसादही मिळत आहे. कृष्णा देखील यात अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. कृष्णा सोबत यात जन्नत जुबेर, नगमा, राज शुकर आणि तन्वी हे देखील आहेत.व्हिडिओत कृष्णा बॉस लेडी अवतारात दिसत आहे. व्हिडिओत वूमनवूड सेलिब्रेट केलं जात आहे. टायगरच्या बहिणीचा हा व्हिडिओ पाहून अभिनेत्री दिशा पाटणी देखील फारच खूश झालेली दिसत आहे. तिने यावर वोह किलिंग इट किशू असं म्हटलं आहे.






