मुनवली येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

अलिबाग-सोगावकर : अलिबाग तालुक्यातील मुनवली महिला मंडळ व मुनवली ग्रामस्थांतर्फे वृक्षारोपण सोहळा मुनवली येथे रामधरणेश्वर डोंगराच्या पायथ्याशी रविवार दि. ४ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मापगांव ग्रामपंचायत सर्वेसर्वा व विद्यमान सदस्य आदरणीय श्री सुनिलआप्पा थळे, सदस्य सौ.सानिका घाडी तसेच मापगांव तंटामुक्त अध्यक्ष विवेक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात मापगाव तंटामुक्त अध्यक्ष विवेक जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मुनवली ग्रामस्थ नुसते झाडे न लावता ते जगवण्याचे देखील काम आपण करत आहात, गेल्या तीन-चार वर्षापासूनची झाडे लावून आपण चांगल्या प्रकारे जगवत आहात याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे सर्व महिला मंडळांचे तसेच या कार्यक्रमाचे अतिशय योग्य प्रकारे नियोजन करणारे श्री सचिन घाडी व घाडी बंधू यांचे मी अभिनंदन करतो.

munawali

मापगांव ग्रामपंचायत सर्वेसर्वा श्री सुनिलआप्पा थळे यांनी मोलाचे मार्गदर्शन करताना सांगितले की, वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे निसर्गाशी बांधिलकी आहे तसेच प्रत्येक व्यक्तीने एक झाड किमान दर वर्षी लावून त्याची वाढ करावी त्यामुळे आपणांस मुबलक ऑक्सिजन मिळतो व पर्यावरणाची हानी होत नाही,निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होते. वृक्षारोपण कार्यक्रमास आपण सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत आहात हे कौतुकास्पद आहे. विशेष करून सर्व ग्रामस्थांना एकत्र करून असे सामाजिक, पर्यावरण विषयक कार्यक्रम यशस्वी करणारे सचिन घाडी यांचे कार्य अतिशय कौतुकास्पद व उल्लेखनीय आहे. सचिन घाडी डोंगरावर लागलेला वणवा रात्री अपरात्री विझविण्यासाठी मित्रांसोबत तसेच प्रसंगी एकटे जाऊन विझवतात, याबद्दल मी त्यांचे विशेष कौतुक करत आहे. वृक्षारोपण व त्यांची जपणूक आपण योग्य प्रकारे करत आहात हे पाहून मी आज अक्षरशःभारावून गेलो आहे.आम्ही ग्रामपंचायतीतर्फे विविध उपक्रम, विकास कामे मुनवली ग्रामस्थांसाठी राबवत आहोत, तसेच विविधप्रकारची विकास कामे केली आहेत व करत आहोत आणि यापुढेही करत राहणार मी व आपली मापगांव ग्रामपंचायत आपल्या सदैव पाठीशी ठामपणे उभे आहोत,असे शेवटी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ व महिला मंडळ, गावातील नागरिक कोरोना महामारीमुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन करत हजर होते.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घाडी बंधू यांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here