[ad_1]
वॉशिंग्टन | कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ जीवाचं रान करत आहेत, मात्र यादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनावरील लस जरी शोधली तरी अनेक वर्षे कोरोना कायम राहण्याची शक्यता आहे.
एआयव्ही, कांजण्या, गोवर यासारख्या आजारांप्रमाणे कोरोना देखील काही विशिष्ट भागांमध्ये सक्रीय राहू शकतो. त्यामुळे आता या आजारासोबतच जगायला शिकलं पाहिजे, असं या विषयातील तज्ज्ञांचं मत आहे.
अमेरिकेत कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे, ती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका कोणते प्रयत्न करते हे पाहणं महत्त्वाचं आहे. यापूर्वी कोरोनाचे चार प्रकारचे विषाणू होते, मात्र आता त्याच पाचव्या प्रकाराची भर पडली आहे.
दरम्यान, संसर्गजन्य रोगांशी मुकाबला करण्यासाठी ठोस अशा उपायांची आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. येत्या काळात या गोष्टी कशाप्रकारे केल्या जातात यावर कोरोनाचं भवितव्य अवलंबून आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
जिल्ह्याची हद्द ओलांडणं संभाजी भिडेंना महागात; पोलिसांत गुन्हा दाखल
राज्यात आज 8381 रूग्ण ठणठणीत होऊन घरी… बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येचा आज उच्चांक!
महत्वाच्या बातम्या-
शाळा कधी सुरू होणार?, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली तारीख
प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न ठरला यशस्वी…!
खाजगी डॉक्टरांसाठी ठाकरे सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
[ad_2]






