[ad_1]
नवी दिल्ली | कोरोना संकटाला चीन जबाबदार असल्याचं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर हल्लाबोल केला होता. त्यातच जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातची बाहुली असल्याचं म्हणत त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेसोबत असलेले सर्व संबंध तोडत असल्याची घोषणा केली.
जागतिक आरोग्य संघटनेवर पूर्णत: चीनची पकड आहे. अशा परिस्थितीत अमेरिका त्यांच्यासोबत असलेले सर्व संबंध तोडत आहे, असं ट्रम्प म्हणाले. याअगोदर जागतिक आरोग्य संघटना जर अशीच चीनधार्जिनी भूमिका घेत राहिलं तर अमेरिका संबंध तोडेल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी आज थेट संबंध तोडल्याची घोषणा केली.
सुरूवातीला जागतिक आरोग्य संघटना करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरली. वर्षाला केवळ 40 दशलक्ष डॉलर्सची मदत करूनही जागतिक आरोग्य संघटनेवर चीनचं वर्चस्व आहे, त्याच्या तुलनेत अमेरिकेकडून 450 दशलक्ष डॉलर्सची मदत केली जात होती. परंतु संघटना आवश्यक त्या सुधारणा करण्यास अपयशी ठरली. त्यामुळे आम्ही सर्व संबंध तोडत आहोत, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारा जो निधी थांबवण्यात आला आहे, तो जगातील अन्य आरोग्य संघटनांच्या मदतीसाठी वापरला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी चीनच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांचीही माहिती दिली.
ट्रेंडिंग बातम्या-
जिल्ह्याची हद्द ओलांडणं संभाजी भिडेंना महागात; पोलिसांत गुन्हा दाखल
राज्यात आज 8381 रूग्ण ठणठणीत होऊन घरी… बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येचा आज उच्चांक!
महत्वाच्या बातम्या-
शाळा कधी सुरू होणार?, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली तारीख
प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न ठरला यशस्वी…!
खाजगी डॉक्टरांसाठी ठाकरे सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
[ad_2]






