डॉ. सोनावणे यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रंटलाईन वर्कर्सना कोविनकिटची भेट

  • जयपाल पाटील यांनी दिली आपत्ती व सुरक्षा पुस्तकाची भेट
  • मा. ता. पत्रकार सेवा संघटनेची मासिक सभा संपन्न

उतेखोल / माणगांव (प्रतिनिधी रविंद्र कुवेसकर) : माणगांव तालुका पत्रकार सेवा संघाच्या मासिक मिटींग च्या औचित्याने माणगांव येथे झालेल्या छोटेखानी सभेत जेष्ठ पत्रकार तथा आपत्ती सुरक्षा तज्ञ रायगड भुषण प्राध्यापक जयपाल पाटील आणि प्रसिध्द उद्योगपती तथा संपादक दै.रायगड लोकशक्ती (आरएनआय अप्रुव्हड) लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान चे प्रमुख डाॅ.संजय अनुसया राजाराम सोनावणे यांचे मा. ता. पत्रकार सेवा संघटनेचे नवनियुक्त सदस्य व पदाधिकारी म्हणुन शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

डाॅक्टर सोनावणे यांचा ५ जुलै हा वाढदिवसा निमीत्ताने सर्व उपस्थितांना लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान तर्फे प्रेमाची भेट वस्तु कोविडकिट देण्यात आली. तर प्राध्यापक जयपाल पाटील यांनी स्वतः लिहिलेले आपत्ती व सुरक्षा सर्वांना पुस्तकही भेट दिले व सामाजिक जाणीवेतुन पत्रकारीतेच महत्व व आपत्ती व सुरक्षा विषयक व्याख्यानपर मोलाचे मार्गदर्शन केले तर डाॅ. सोनावणे यांनी आपण उद्योजक समाजसेवक ते आता नविन दैनिक रायगड लोकशक्तीचे संपादक यातुन पत्रकारीतेच्या क्षेत्रात का पदार्पण केले या विषयी मनोगत व्यक्त केले. तसेच डाॅ. संजय सोनावणे यांच्या वाढदिवसानिमीत्त तालुक्यातील काही ग्रामपंचायती व माणगांव नगरपंचायतचे सफाई कामगार, आशा वर्कर्स, पाणीपूरवठा कामगारांना तसेच पत्रकारांना कोविनकिट वाटप करण्यात येत आहे.

raigad
या सभेत पत्रकार संघाचे संस्थापक अरुण पवार तर अध्यक्ष रविंद्र कुवेसकर, कार्याध्यक्ष उदय चव्हाण, उपाध्यक्ष प्रमोद जाधव, सचीव सुनिल राजभर, खजिनदार-परेश शिंदे, सह-खजिनदार-वैभव सत्वे, प्रसिद्धी प्रमुख राम भोस्तेकर कार्यकारिणी सदस्य पांडुरंग माने, मुकेश कडू, प्रमोद मोहिरे, चिन्मय म्हापसेकर, निरंजन कळस हजर होते तर पुढील कार्यक्रमास रायगडचा युवा साप्ताहिकाचे छायाचित्रकार रणपीसे, लोक संजीवनी प्रतिष्ठानचे राष्ट्रीय उपाध्यक्ष (प्रशासन) निलेश सोनावणे, संजीवनी शिर्के राष्ट्रीय प्रमुख संयोजक आणि पदाधिकारी खेमराज राऊळ, मिलींद शेट, सुधाकर पालकर गुरुजी यांच्या सह मान्यवर सदस्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here