एकमेका सहाय्य करु ! कोरोनात गरजूना मदत करु!
मुंबई (उपसंपादक सुनिल तांबुसकर) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रत्नागिरीतील आंबवडे येथिल, सुप्रसिद्ध गावातील आणि नालासोपारा येथे वास्तव्यास असणारे मनोज मधूकर आंबेडकर यांच्या राहत्या घरी त्यांच्या पियुष व यश या मुलांना मोफत “पाठ्यपुस्तके वह्या,पेन इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी ची “पाठ्यपुस्तके वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला.
सदर “पाठ्यपुस्के व शालेय साहित्य, आद. जयभिम नारनवरे(आयकर अधिकारी),”सुनिल गंगाधर तांबुसकर (डॉ.आंबेडकरांचे पणतू), संदेश सावळाराम जाधव(अध्यक्ष) आणि आद.संजय ग. जाधव दि”बुद्धिस्टसोशियलफाऊंडेशन ,मुबंई यांच्या मार्फत वाटप करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला संजय गंगाराम जाधव (सुप्रसिद्ध सिनेनिर्माते व दिग्दर्शक),आयु.”मित्रबोधी खैरे(अध्यक्ष-बुद्धांकुर फांऊडेशन खानदेश व मुंबई), “विजयसिंग रामसिंग खंदारे(थोर समाजसेवक,आरे मुंबई),माननीय.श्रीमती.”सिमा जाधव डायरेक्टर – क्लीयर हेअरिंग अँड स्पिच सेंटर ,नालासोपारा) आदी मान्यवर उपस्थित होते.






