मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी यंदाही विशेष रेल्वे सोडण्यात येणार असून त्याची घोषणा सोमवारी मध्य आणि कोकण रेल्वेने केली. सुरुवातीला ७२ विशेष गाडय़ा सोडण्यात येणार असून ५ सप्टेंबर पासून त्या धावण्यास सुरुवात होईल. त्याचे आरक्षण ८ जुलैपासून होणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने गणेशोत्सवानिमित्त यंदाही मुंबई व परिसरातून कोकणात जाणाऱ्यांसाठी शासनाकडून विलगीकरण आणि कोरोना चाचणीची अट बंधनकारक केली जाऊ शकते.
गेल्या वर्षी २२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून १८४ विशेष रेल्वे गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. परंतु १४ दिवसांच्या विलगीकरणाच्या अटीमुळे अनेकांनी आठवडय़ाभरापासून खासगी वाहनांनी कोकण गाठले होते. विशेष रेल्वेबरोबरच एसटी गाडय़ांचीही घोषणा नंतर केली. १२ ऑगस्टपूर्वी पोहोचल्यास दहा दिवसांच्या विलगीकरणाची अट आणि त्यानंतर गावी जायचे असल्यास ४८ तास पूर्वी कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक केले होते. यामुळे रेल्वे व एसटीने जाणाऱ्या प्रवाशांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. काहींनी गावी जाणेही टाळले होते. त्यामुळे कोकणासाठी सोडलेल्या गाडय़ांना फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. यंदा १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्याआधी रेल्वेकडून सुरुवातीला ७२ विशेष गाडय़ांची घोषणा करण्यात आली आहे. यात सीएसएमटी ते सावंतवाडी, सीएसएमटी ते रत्नागिरी, पनवेल रत्नागिरी गाडय़ांचा समावेश आहे.
विशेष रेल्वेगाडय़ा :
सीएसएमटी ते सावंतवाडी (३६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१२२७ सीएसएमटी येथून ५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबपर्यंत दररोज मध्यरात्री १२ वाजता सुटेल आणि सावंतवाडी येथे दुपारी दोन वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१२२८ सावंतवाडी येथून याच काळात दुपारी २ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता पोहोचेल.
सीएसएमटी ते रत्नागिरी (१० फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१२२९ ही सीएसएमटीतून ६ सप्टेंबर ते २० सप्टेंबपर्यंत प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी १.१० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी रात्री १०.३५ वाजता पोहोचल.
गाडी क्रमांक ०१२३० रत्नागिरी येथून ९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबपर्यंत प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी रात्री ११.३० वाजता सुटून सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल.
पनवेल ते सावंतवाडी रोड (१६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१२३१ पनवेल येथून ७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबपर्यंत प्रत्येक मंगळवार, बुधवारी आणि शनिवारी सकाळी ८ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री आठ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१२३२ सावंतवाडी रोड येथून याच काळात मंगळवार, बुधवारी आणि शनिवारी रात्री पावणेनऊ वाजता सुटून पनवेल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.१० वाजता पोहोचेल.
पनवेल ते रत्नागिरी (१० फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१२३३ पनवेल येथून ९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबपर्यंत प्रत्येक गुरुवारी व रविवारी स. ८ वाजता सुटून रत्नागिरी येथे त्याच दिवशी दुपारी ३.४० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२३४ रत्नागिरी येथून ६ सप्टेंबर ते २० सप्टेंबपर्यंत प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी रात्री ११.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी स. ६ वाजता पोहोचेल. ’ सीएसएमटी ते सावंतवाडी (३६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१२२७ सीएसएमटी येथून ५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबपर्यंत दररोज मध्यरात्री १२ वाजता सुटेल आणि सावंतवाडी येथे दुपारी दोन वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१२२८ सावंतवाडी येथून याच काळात दुपारी २ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता पोहोचेल.
सीएसएमटी ते रत्नागिरी (१० फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१२२९ ही सीएसएमटीतून ६ सप्टेंबर ते २० सप्टेंबपर्यंत प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी १.१० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी रात्री १०.३५ वाजता पोहोचल.
गाडी क्रमांक ०१२३० रत्नागिरी येथून ९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबपर्यंत प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी रात्री ११.३० वाजता सुटून सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल.
पनवेल ते सावंतवाडी रोड (१६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१२३१ पनवेल येथून ७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबपर्यंत प्रत्येक मंगळवार, बुधवारी आणि शनिवारी सकाळी ८ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री आठ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१२३२ सावंतवाडी रोड येथून याच काळात मंगळवार, बुधवारी आणि शनिवारी रात्री पावणेनऊ वाजता सुटून पनवेल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.१० वाजता पोहोचेल.
पनवेल ते रत्नागिरी (१० फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१२३३ पनवेल येथून ९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबपर्यंत प्रत्येक गुरुवारी व रविवारी स. ८ वाजता सुटून रत्नागिरी येथे त्याच दिवशी दुपारी ३.४० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२३४ रत्नागिरी येथून ६ सप्टेंबर ते २० सप्टेंबपर्यंत प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी रात्री ११.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी स. ६ वाजता पोहोचेल.