चोपडा (यशवंत जडे) -एक ऑगस्ट रोजी राज्यात भाजपतर्फे दूध दरवाढीच्या व इतर स्थानिक मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे .यासंदर्भात तालुका व शहर भाजप कार्यकर्त्यांनी नुकताच एका बैठकीत विचार विनिमय करून आंदोलनाची निश्चिति करण्यात आली. अध्यक्ष स्थानी तालुका अध्यक्ष पंकज पाटील होते .
बैठकीत प्रारंभी पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी व संरक्षण मंत्री मा. राजनाथसिंह यांनी देशरक्षणार्थ राफेल विमान खरेदी करून भारतीय जनतेची ताकद जगाला दाखवली व देशवासियांचे मनोबल वाढविण्याबद्दल मा.पंतप्रधान मोदीजी व ना .सिंह यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार राजुमामा भोळे यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
बैठकिस जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील , शहर अध्यक्ष तथा नगरसेवक गजेंद्र जैसवाल , कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक धनंजय पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष नरेंद्र पाटील, तालुका अध्यक्ष प्रकाश ल पाटील, शहर अध्यक्ष तुषार पाठक,भाजपा उपाध्यक्ष देविदास पाटील, विठ्ठल पाटील, शहरचिटणीस मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे,जेष्ठनेते अनिल पालीवाल , चिटणीस तथा जिल्हा संवाद संयोजक भरत सोनगिरे , बापूराव पाटील भाजपा प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे, कार्यालय मंत्री मोहित भावे उपस्थित होते. बैठकीचे प्रास्तविक व सूत्र संचलन शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल व आभार प्रदर्शन सरचिटणीस मनोहर बडगुजर यांनी मानले.







