मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारने केले ८ राज्यांमध्ये नवीन राज्यपाल नियुक्त 

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. अशातच मोदी सरकारने मोठा निर्णय घेत ८ राज्यांमध्ये नवीन राज्यपाल नियुक्त केले आहे. याबाबत राष्ट्रपती भवनाद्वारे एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

या पत्रकानुसार, केंद्रीय मंत्री थावर चंद गहलोत यांना कर्नाटकचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून ते मंत्रिमंडळात होते. यासह गुजरात भाजपाचे नेते मंगुभाई छगनभाई पटेल यांना मध्यप्रदेश तर गोवा भाजपाचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ अर्लेकल यांच्याकडे हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाची सूत्रं देण्यात आली आहेत.

 

आंध्र प्रदेशचे भाजप नेता डॉ. हरि बाबू कंभमपती यांना मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मिझोरामचे राज्यपाल पीएस पिल्लै यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हरयाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी, तर त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्याकडे हरयाणाच्या राज्यपालपदाची सूत्रं देण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here