कॉग्रेसचा हात सोडून कृपाशंकर सिंह हाती धरणार कमळ

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग आणि नाशिक जिल्ह्यातील युवा नेता यतीन रावसाहेब कदम हे बुधवार ७ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. यतीन कदम हे निफाड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र असून नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात होणार आहे.मुंबईत २०२२ मध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा झटका समजला जात आहे.

कृपाशंकर सिंह यांचा स्वत:चा असा मतदारवर्ग आहे. तसेच ते मुळचे उत्तर भारतीय असल्यामुळे त्याचा फायदा थेट हा भाजपला होणार आहे. याचा फायदा भाजपला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होऊ शकतो. मुंबईत एकूण ४० ते ५० लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. हाच आकडा एकूण टक्केवारीपैकी २५ टक्के एवढा असल्यामुळे उत्तर भारतीय मतदार कृपाशंकर सिंह यांच्या भाजप प्रवेशानंतर पाठीशी राहणार की काँग्रेसलाच साथ देणार, हे येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कळेल.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक कृपाशंकर सिंह हे आहेत. कृपाशंकर यांच्यामुळे काँग्रेसला आतापर्यंत उत्तर भारतीयांची मते मिळाली आहेत. कृपाशंकर हे २००४ मध्ये राज्यमंत्रीपदी होते. तसेच २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना घवघवीत यश मिळाले होते. कृपाशंकर यांनी आतापर्यंत मुंबई काँग्रेस अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री यासारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here