अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : 27फेब्रुवारी2021रोजी एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम एका वेळी 100 फेमिटो सॅटेलाईट रामेश्वरम येथून प्रक्षेपित करून जागतिक विक्रम केला. या सॅटेलाईट बांधणी व निर्मिती मध्ये अलिबागच्या मुलांनीही सहभाग घेतला होता. त्यातील अवधूत संदीप वारगे रा. अलिबाग या विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त राजू झावरे यांनी शुभेच्छा रूपी मेसेज दिला आहे. अवधूत चे वडील हे प्राथमिक शिक्षक असून जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
या शुभेच्छा पत्रात त्यांनी लिहिले आहे की, अवधुत आज तुझा वाढदिवस…….. खरंच खूप भाग्याचा दिवस…
खरंतर मुलगा म्हणजे मनाचा मानबिंदू असतो प्रत्येक आई-वडिलांचा. आणि तू तर आतापर्यंत त्यांच्यातले भावबंद ह्रदय स्पदंनानी आजपर्यंत जपत आला आहेस. “बाळपणीचा काळ सुखाचा” असं म्हणतात.त्याला अनेक कारणं आहेत. त्यात तू तर फार निरागस आहेस.पण एक आहे तूला अभ्यासांचे टेन्शन नसतं म्हणजे न घेता सुध्दा पास होतोस. शिक्षकांनी जे सांगातीलं ते शिकायचं अन् मोठे सांगतील ते ऐकायचं…..जसं येईल तसं आयुष्य जगायचं..हे तुझं आपलं बरं आहे.
जन्माला आलास आणि आई-वडिलांना समृद्ध केलंस. आज नव्या वर्षात पदार्पण करतोस,खूपच आनंदाची गोष्ट आहे.आणि कौतुकास्पद पण… आतापर्यंत कोणत्याही अनुचित गोष्टींचा आधार घेतला नाहीस तू किंवा कोणाला दुखावलं नाहीस. ही गोष्ट दाद देण्यासारखी आहे. मुलगा म्हणजे बापाची फार मोठी ताकद असते. तुझ्या पप्पांना काही वर्षापासून ओळखतो(न पाहता सुद्धा ) तेव्हा पासून नेहमीच आमची आवर्जून आपुलकीने चौकशी करत आलेत, ही आपुलकी आम्हाला वेळोवेळी भावली आणि लाभली. तुमच्या या जिव्हाळ्याबद्दल आमचं कुटुंब तुमचे सतत आभारी आहे.
अवधूत तुझ्या आई बाबांचा प्रवास समांतर आहे आणि त्याचा जागृत साक्षीदार म्हणून तू आहेस. आई वडील आपले कर्तव्य निभावतात तसं तुही तुझं कर्तव्य निभावत आहेसच. तुझ्यामुळे त्यांच्या समाजजीवनाला नवा बहर आला, तो तुझ्या रूपानं चहूअंगाने फुलून येऊ लागला आहे. नवसर्जनाचा वारसा पुढे तू चालवला पाहिजेस आणि तेही पूर्ण निष्पक्षतेने… तुझ्या वडिलांविषयी काय सांगायचं.. खूप मेहनती आहेत… मी पाहतो ना अक्षरशः कामाशी एकरूप असणारा शिक्षक …मला वाटतं त्यांचे मित्र कमी असतील पण जे असतील ते खरोखर स्वतःला भाग्यवान समजत असतील. तुझे पप्पा नेहमी बोलतात “खरा मित्र हा मनमुराद कौतुक करणारा, संकटात आधार देणारा, मदतीला धावून येणारा, आनंद वाटून घेणारा, प्रसंगी कटू पण पथ्यकर औषध पाजणारा असावा.” आणि खरंच की जसे तुझे वडील (पप्पा) आहेत. त्यानीं कधीही आपल्या मैत्रीची चौफेर भूमिका सोडली नसावी. ते नेहमी खूप संयमी आणि नम्रपणे बोलत असतात. तुमच्या जवळच्या लोकांना किंवा समाजातील चांगल्या गोष्टींना ते नेहमी पाठबळ देत असतील हे सांगायला नको. याशिवाय तुझ्या आईची पुण्याई खूप मोठी आहे तीच तुझ्या कामी येत असेल.
येईल त्या परिस्थिती साठी आपली मानसिक आणि शारीरिक तयारी हवी आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं ही तुमच्या पप्पांची शिकवण तुझ्या पुढील जीवनात अनेक वेळा कामी येणारी आहे…
असो…तुझ्या विचारात प्रगल्भता आहे. हालचालीत आत्मविश्वास आहे. म्हणुन तर आज तू ग्रीनिज वर्ड रेकाॅर्ड, असेट वर्ड रेकाॅर्ड,वर्ड रेकाॅर्ड एशिया रेकाॅर्ड असे कैक रेकाॅर्डच्या यादीत तू बसलास खरं सांगू का तूझ्या पेक्षा तूझ्या वडिलांना खूप बरं वाटतं असेल अभिमानानं त्यांची मान गौरवशील केलीस तू… तूझं खूप खूप अभिनंदन!!!तू सुखाच्या शिखरावर सतत रहावं. तुझ्या आयुष्यात येणारं नव वळण हे आणणाऱ्या नव्या व्यक्तीमत्वाला झळाली देणारी येवो…! बेटा… लव यू.. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!






