शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : दिव्यांग बांधवासाठी प्राधान्याने स्वतंत्र लसीकरण कॅम्प अत्यंत गरजेचे आहे. लसीकरण केंद्रावर रांगेत ताटकळत उभे राहणे तसेच काही अतिविकलांग स्वरुपाचे दिव्यांग असून त्यांना व्हिलचेअर शिवाय पर्याय नाही, तर काही 100% अंध असल्याने कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीने केंद्रावर येणे / जाणे अवघड असून प्रवास करणे त्यांना अशक्य असते.
त्यामुळे लसीकरण केंद्रावर जाणे दिव्यांग बांधावस अत्यंत त्रासदायक ठरते, अधिक महत्त्वाचे म्हणजे सामान्य माणसाच्या तुलनेत त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने परिणामी त्यांना कोरोना संक्रमणची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने देखिल दि.26/04/21 रोजीच्या पत्रान्वये दिव्यांग बांधवाना प्राधान्याने कोविड-19 लसीकरन करण्यासंदर्भात संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत.
दिव्यांग बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने श्री साईबाबा संस्थानच्या लसीकरण केंद्रात स्वतंत्र कॅम्प सुरु करावे. यावेळी तालुका वैद्यकीय अधिक्षक डॉ.घोगरे सर यांनी विकलांग बांधवांच्या वय वर्ष १८ व ४५ नुसार यादी तयार करून त्यांचे लसीकरण करून घेऊ असे आश्वासन दिले.






