भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन
पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : नव्याने सुरू झालेल्या बी.टेक. (रोबोटिक्स अॅण्ड ऑटोमेशन ) या अभ्यासक्रमावरील दोन दिवसीय चर्चासत्रास चांगला प्रतिसाद मिळाला.भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजन करण्यात आले होते. भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी उद्घाटन केले.
पार्कर हॅनिफीनचे राकेश तिवारी, सुनील हजरनीस, इंटेलेक्टीक्स इन्स्टिट्यूट अॅण्ड इनोव्हेशन प्रा.लि. चे कौस्तुभ कुलकर्णी, सुशांत साळुंखे, एस.व्ही.आर. इन्फोटेकचे विनोद आटपाडकर, आयआयटी रोपारचे डॉ.एकता सिंगला, एनआयटी भोपाळचे डॉ. रवी कुमार या चर्चासत्रात सहभागी झाले.
डॉ.के.बी. सुतार यांनी स्वागत केले.ए.एन. नायक यांनी आभार मानले.बी.टेक. (रोबोटिक्स अॅण्ड ऑटोमेशन ) हा अभ्यासक्रम पार्कर हॅनफिन इंडिया प्रा.लि. तसेच इंटलेक्टीक्स इन्स्टीट्यूट अॅण्ड इनोव्हेंशन प्रा.लि. यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे.
डॉ. आनंद भालेराव म्हणाले, ‘ सध्याच्या शैक्षणिक _ औद्योगिक जगतात शैक्षणिक संस्थांना नव्या अभ्यासक्रमात संवाद साधणे आवश्यक झाले आहे. विद्यार्थी सक्षम, रोजगारक्षम होणे आवश्यक आहे. भारती विद्यापीठाने त्यासाठी अनेक महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. अभ्यासक्रमात इंटर्नशीपचा समावेश करणारे भारती विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ आहे. उद्योगजगताला शैक्षणिक प्रक्रियेत जोडण्यासाठी अनेक उपक्रम भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु करण्यात आले आहेत. रोबोटिक्स, ऑटोमेशनच्या या नव्या अभ्यासक्रमामुळे उद्योग जगताला अत्याधुनिक, अद्ययावत ज्ञानाने परिपुर्ण अभियंते मिळतील.






