मोटार सायकल चोरीप्रकरणी त्रिकुट एलसीबीच्या जाळ्यात

धरणगाव (तालुका क्राइम रिपोर्टर ज्ञानेश्वर महाडिक) : सध्या राज्यभरात चोरीचे गुन्हे उघडकीस आणले जात असून या तपासावर लक्ष दिले जात आहे.जळगाव एलसीबी पथकाने आज मोटार सायकल चोरी प्रकरणी तिघांना अटक केली आहे.

धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्हच्या तापसकामत प्राप्त माहितीनुसार चेतन योगेश पाटील(शनी मंदिर चौक पारोळा)यास एलसीबी पथकाने चौकशी कामी ताब्यात घेतले.चौकशी दरम्यान त्यांच्याकडून सागर रविंद्र पाटील(शनी मंदिर पारोळा)व विक्रम अरुण गायकवाड(पारोळा)या दोघाची नावे पुढे आली.दुचाकी चोरी करण्याचे काम तसेच विक्रम गायकवाड याने चोरीच्या मोटार सायकल विकत घेण्याचे काम केल्यामुळे त्याला देखील आरोपी करण्यात आले आहे.त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

motorcycle

सदर कामगिरी पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या निर्देशाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ.प्रदीप पाटील, प्रमोद लादवंजारी, किरण धनगर, विनायक पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, मुरलीधर बारी, अशोक पाटील, आदींनी तपास कामात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here