कश्मीरमधील लष्कराच्या फायरिंग रेंजला विद्या बालनचे नाव

जम्मू (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : अभिनेत्री विद्या बालनची बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख आहे . चौकटीबाहेरच्या भूमिकांसाठी विद्या ओळखली जाते . नुकताच ऑस्कर समितीत तिचा समावेश झाला आहे . त्यानंतर आता तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे . कश्मीरमधील लष्कराच्या फायरिंग रेंजला विद्याचे नाव देण्यात आले आहे .

हिंदुस्थानी लष्कराची गुलमर्ग येथील फायरिंग रेंज ‘विद्या बालन फायरिंग रेंज’ म्हणून ओळखली जाईल. यापूर्वी या रेंजला कोणतेही नाव नव्हते. या वर्षी फेब्रुवारीत विद्या बालन कश्मीरमधील गुलमर्ग विंटर फेस्टिव्हलमध्ये तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत उपस्थित राहिली होती.

साहसी, स्वतंत्र विचारसरणीची तसेच स्वावलंबी स्त्रियांची प्रतिमा पडद्यावर साकारून आपला ठसा उमटवणाऱया अभिनेत्रीच्या सन्मानार्थ लष्कराने फायरिंग रेंजला विद्या बालनचे नाव देण्याचे ठरवले. अलीकडेच ऑस्कर समितीने विद्याला आपल्या प्रशासकीय मंडळात सहभागी होण्याचे आमंत्रण पाठवले होते. या वर्षी ऑस्कर समितीत समाविष्ट होणारी भारतातील एकमेव अभिनेत्री ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here