तालिबानविरोधात अफगाण महिला सशस्त्र लढा देण्यास सज्ज

काबूल : अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर तालिबानने आक्रमक भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तानमधील अनेक भागांमध्ये तालिबानने ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये उत्तर बख्खन या प्रातांचाही समावेश आहे. जवळपास २० वर्षांपूर्वी हा भाग तालिबानविरोधकांचा गड समजला जायचा. काही ठिकाणी सुरक्षा जवान मागे हटत असल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे अफगाणिस्तानमधील महिलांना तालिबानविरोधात शस्त्र हाती घेतले आहेत. तालिबानी दहशतवाद्यांविरोधात संघर्ष करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानच्या मध्य घोर प्रांतात शेकडो महिलांनी हाती शस्त्रे घेत तालिबानविरोधात घोषणाबाजी केली. कोणत्याही परिस्थितीत अफगाणिस्तान कट्ट्ररतावाद्यांकडे जाता कामा नये अशी भूमिका महिलांनी घेतली आहे. तालिबानच्या राजवटीत महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्या जाचातून जावे लागले, हे विसरलो नसल्याचे महिलांनी यावेळी सांगितले.

या निर्दशनात सहभागी असलेल्या काही महिला या सुरक्षा दलाच्या जवानांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आल्यात. मात्र, या निदर्शनातील बहुतांशी महिलांची तालिबानसोबत दोन हात करण्याची तयारी असल्याचे हलिमा परास्तिश या आंदोलक महिलेने म्हटले. हलिमा या घोर प्रांतातील महिला संचालनालयाच्या प्रमुख आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here