नवी दिल्ली : टोकियो -२०२० ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाच्या सुविधांच्या तयारीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जुलै रोजी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
आपल्या ट्वीट संदेशांमध्ये पंतप्रधान म्हणाले, “टोकियो २०२० मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाच्या सुविधांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. लॉजिस्टिकल तपशील, त्यांची लसीकरण स्थिती, खेळाडूंना आवश्यक विविध शाखीय समर्थन यावर चर्चा केली.
Reviewed preparations for facilitation of India’s contingent at @Tokyo2020. Discussed the logistical details, their vaccination status, the multi-disciplinary support being given. pic.twitter.com/JELGZsls3X
— Narendra Modi (@narendramodi) July 9, 2021
१३० कोटी भारतीयांच्यावतीने मी १३ जुलै रोजी ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी संवाद साधणार आहे. चला आपण सर्वानी #Cheer4India. भारतीय खेळाडूंचा हुरूप वाढवूया.






