थोर गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ ग्रंथावरील वेबिनारला चांगला प्रतिसाद

भारतीय गणिती वारसा पुढे आणण्यासाठी ‘ अंक नाद ‘ अॅपचा पुढाकार

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : मॅप एपिक कम्युनिकेशन्स च्या ‘अंकनाद ‘ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ या ग्रंथावर वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.१० जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या नवव्या सत्राला चांगला प्रतिसाद मिळाला . ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दहावे सत्र होणार आहे . गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांनी शनिवारी ‘अपूर्णांकावरील कृत्ये’ विषयावर मार्गदर्शन केले. रविवारी ‘व्यस्त विधी आणि इष्टकर्म ‘या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.वर्षभर हा वेबिनार उपक्रम चालणार आहे.

भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने,आपल्या इतिहासात दडलेलं गणिती वैभव मांडणारा एक अभिनव उपक्रम म्हणून ‘अंक नाद’ अॅपने पुढाकार घेतल्याची माहिती मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे संचालक मंदार नामजोशी यांनी दिली.निर्मिती नामजोशी यांनी श्लोकांचे गायन केले.

समीर बापट ,वैशाली लोखंडे, प्राची साठे यांच्यासह गणिताचे अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले. प्राची साठे यांनी सूत्रसंचालन केले. अपूर्णांकांचे वर्ग करण्याचे नियम भारतीयांनी जगाला घालून दिले .ते नियम आजही पाळले जातात . शून्य आणि सर्व दशमान पद्धती ही भारताची जगाला देणगी आहे, असे डॉ.आगरकर यांनी सांगीतले.

आद्य गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती या महान ग्रंथाच्या विवेचनाच्या माध्यमातून भारताला लाभलेला बुद्धिमत्तेचा वारसा रंजक पद्धतीने उलगडला जाईल. आतापर्यंत अंक नादच्या माध्यमातून गणितासंबंधी विविध विषयांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते, त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here