‘बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन’ की दहावी पास?
नवी दिल्ली : केंद्रीय गृह राज्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच पश्चिम बंगालच्या कूचबिहारचे भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिथ प्रामाणिक चर्चेत आले आहेत. तृणमूल काँग्रेसकडून निशित प्रामाणिक यांच्या शैक्षणिक दाखल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. प्रामाणिक यांनी पदवी मिळवलीय की ते केवळ दहावी पास आहेत, असा प्रश्न तृणमूलकडून उपस्थित करण्यात आलाय.
सरकारी वेबसाईटवर खासदारांच्या शैक्षणिक योग्यतेसमोर निशिथ प्रामाणिक यांचं शिक्षण ‘बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन’ पास असल्याचं दाखवण्यात आलंय. परंतु, निवडणुकीदरम्यान सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात मात्र प्रामाणिक यांची दहावी पूर्ण केल्याचा उल्लेख आहे, असं कूचबिहारचे तृणमूल नेते पार्थप्रतिम रॉय यांनी आपल्या फेसबुक पेजवर म्हटलंय.
https://www.facebook.com/ParthaPratimRayOfficial/posts/3020040328264428






