दि. ११ जुलै राशिभविष्य : कर्क राशीमध्ये शुक्र, मंगळ आणि चंद्राचा संयोग; या राशींना ठरेल लाभदायक

    मेष : तुम्ही करत असलेल्या कामात यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यापारी वर्ग अनुभवाच्या जोरावर व्यापारिक क्षेत्राचा विस्तार करतील. जोडीदाराचे सहाय्य व सानिध्य मिळेल. परदेशी असलेल्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल त्यामुळे मन प्रसन्न होईल. प्रेम जीवनात नवीन अध्याय सुरु होईल. संध्याकाळचा वेळ जवळच्या लोकांसोबत हास्य-विनोदात व्यतीत होईल. त्यांच्या मदतीने अडकलेले काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.

    वृषभ : व्यापारासाठी योग्य वेळ आहे. नवीन संपर्कातून पद व प्रतिष्ठा वाढेल. मुलांच्या बाजूने निश्चिंत असाल. राजकीय क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कामात व्यस्त असल्याने प्रेम जीवनात दुरावा येऊ शकतो. संध्याकाळच्या वेळी अप्रिय लोकांची भेट होऊ शकते. त्यामुळे त्रास सहन करावा लागू शकतो.

    मिथुन : विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग खुला होईल. मौल्यवान वस्तू आणि दस्तावेज सांभाळून ठेवा अन्यथा त्याची चोरी होण्याची किंवा ते हरवण्याची भीती संभवते. व्यापारात सकारात्मक बदलाने लाभदायक स्थिती निर्माण होऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि संपत्तीचा विकास होईल. मित्रांची मदत करण्याची संधी मिळेल. संध्याकाळी रखडलेले काम पूर्ण झाल्याने आनंद होईल. एखाद्या कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल.

    कर्क : घर व गाडी खरेदी करण्याची इच्छा असेल तर प्रयत्नांना यश मिळेल. मुलांप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची पूर्तता होईल. विवाहेच्छुक लोकांसाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. उपजीविकेच्या क्षेत्रात प्रगती होईल. परदेशाशी असलेले संबंध तुमच्या फायद्याचे ठरतील. प्रेम जीवनात जवळीकता निर्माण होईल. संध्याकाळी आवडत्या लोकांची भेट व चांगली बातमी मिळेल.

    सिंह : आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. कौटुंबिक समस्यांचे निवारण करण्यात सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धेत यश मिळेल. कौटुंबिक खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आवेगाच्या भरात घेतलेला निर्णय तुमच्यासाठी तोट्याचा ठरू शकतो. व्यापारिक क्षेत्रात बोलण्यातील सौम्यता तुम्हाला सन्मान मिळवून देईल. शत्रू आपापसात लढून नष्ट होतील.

    कन्या : नशिबाची साथ मिळाल्याने रोजगार व व्यापाराच्या क्षेत्रातील करत असलेल्या प्रयत्नांना अकल्पनीय यश मिळेल. मुलांच्या बाजूने आनंददायक बातमीमुळे मनावरचे ओझे कमी होईल. दुपार नंतर कोर्ट-कचेरीतील खटल्यात तुमचा विजय आनंदाचे कारण ठरू शकतो. इच्छित प्रस्ताव मान्य झाल्याने व्यापारात प्रगती होईल. धार्मिक कामात केलेला खर्च तुमचे यश द्विगुणीत करेल. मित्रांच्या सहाय्याने सरकारी कामे पूर्ण होतील.

    तूळ : आज तुमच्या चहूबाजूंनी आनंदाचे वातावरण असेल. नोकरी-व्यवसायात तुमच्या इच्छेनुसार वातावरण असेल. तुमच्या कार्यशैलीत वाढ होईल. सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने बऱ्याच दिवसांपासून असलेली समस्या व देण्या-घेण्याची समस्या नाहीशी होईल. मुबलक धनप्राप्ती झाल्याने आनंद होईल. संध्याकाळी मित्रांबरोबर प्रवासाचा योग आहे परंतु तो स्थगित होऊ शकतो.

    वृश्चिक : तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल. व्यापारिक कामात प्रगती झाल्याने अनुभवाची मदत मिळेल. विरोधकांचा पराभव होईल. आरोग्याची काळजी घ्या. वेळोवेळी डॉक्टरांशी चर्चा करा. विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टीने चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक धन-संपत्तीत वाढ होईल. आई-वडिलांचा आशीर्वाद नेहमी असेल.

    धनू : व्यापारात प्रगती झाल्याने विरोधक तुमचे कौतुक करतील. भावंडांच्या सहाय्याने अडकलेली कामे मार्गी लागतील. सासरकडून मुबलक पैसे मिळण्याची शक्यता आहे. सरकार सत्तेशी असलेली घनिष्ठता लाभदायक असेल. कौटुंबिक स्थिती अनुकूल नाही. वडिलांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळेल. तुमच्या प्रयत्नांमध्ये जोडीदाराचे सहाय्य मिळेल. संध्याकाळच्या वेळी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

    मकर : कार्यक्षेत्रातील तुमचा कर्मठपणा नवीन उर्जा देईल. त्यामुळे खोळंबलेली कामे पूर्ण होताना दिसतील. उपजीविकेच्या क्षेत्रात केलेलं प्रयत्न यशस्वी होतील. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. दुपारच्या वेळी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. कौटुंबिक गोष्टीत व व्यापारात यश मिळेल, अधिनस्थ कर्मचार्यांचा आदर व सहकार्य मिळेल. संध्याकाळी कोणत्याही विवादात अडकू नका.

    कुंभ : नोकरीत बदल करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. महिला सहकाऱ्याच्या मदतीने उन्नतीच्या संधी मिळतील. व्यापारात धावपळ करावी लागू शकते. त्यामुळे तुमच्या सुखात व आरोग्यात अडथळा येऊ शकतो. विपरीत बातमी ऐकून बाहेर जावे लागू शकते. त्यामुळे सतर्क राहा आणि भांडण-तंट्यापासून लांब रहा. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवाल.

    मीन : मुलांबद्दलच्या चिंता मिटतील. त्यांचे काम हळू हळू पूर्णत्वास येईल. वडिलांच्या सहाय्याने वैवाहिक जीवनात असलेला विरोध मावळेल. विद्यार्थ्यांनी एकाग्र होऊन मेहनत व प्रयत्न केले पाहिजेत. नातेवाईकांमध्ये देणे-घेणे करू नका अन्यथा नाती खराब होऊ शकतात. धार्मिक क्षेत्रातील यात्रा व पुण्य कामात खर्च होईल. त्यामुळे यशात वाढ होईल. प्रेमजीवनात गोडव्याचा अनुभव घ्याल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here