नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जुलैला मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा ७ जुलैला विस्तार केल्यानंतर मंत्रिमंडळाची ही दुसरी बैठक असणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री व केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या बैठकी गुरुवारी घेतल्या आहेत. कोरोनाच्या लढाईत कोणतीही कमतरता राहू नये, अशी सूचना पंतप्रधानांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.
गेली काही दिवस मास्क न घातलेल्या लोकांच्या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्याचेही पंतप्रधानांनी नवीन मंत्र्यांना सांगितले आहे. लोक कोरोनाच्या काळातील नियम पाळत नसल्याचे चित्र सुखावह नाही, असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.






