शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शासकीय विश्रामगृह येथे शिर्डी शहर काँग्रेसची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महागाई विरोधातील आंदोलन,हेतू ठेवून पक्षाशी नातं सांगणाऱ्याना बाजूला ठेवणं याचबरोबर अनेक महत्वपूर्ण विषयांसह पक्ष संघटन वाढी बाबत ठोस अशा उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव प्रसाद शेळके, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अमृत गायके, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उमेश शेजवळ,योगेश गायके,माजी नगरसेवक सुरेश आरणे, ॲड अविनाश शेजवळ यांनी मनोगत व्यक्त केले. युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मदन मोकाटे,समीर शेख काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मोसिन सय्यद,मोसिन खान,मंगेश खाकाळे, एनएसयूआयचे तालुकाध्यक्ष स्वराज त्रिभुवन,शहर उपाध्यक्ष अरबाज कादरी,आसिफ शेख, शहर संघटक राजू बरडे, शिर्डी शहर युवक काँग्रेसचे सचिव कृष्णा गायकवाड,योगेश निर्भवणे,महावीर धुताडमल,अमोल धुताडमल,हरीश शीलावंत,आदित्य आरणे,विशाल अहिरे,ईश्वर भोंडगे,इरफान पठाण, शिवाजी भोंडगे,भूषण आरणे,योहान गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.







