शिर्डीतील अनेक तरुणांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : काँग्रेसची विचारधाराच देशाला आणि खिळखिळी झालेल्या देशाच्या व्यवस्थेला वाचवू शकते. वाढती महागाई गरिबांच्या मुळावर उठली आहे..आणि या वाढत्या महागाईला जबाबदार असणाऱ्या भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी तरुणाई पुढे येत आहे..सात वर्षांपूर्वी खोटी आश्वासने देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला भुलविण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपाला आता इथली तरुणाई पुन्हा भुलणार नाही.जनता आता जागृत झाली आहे..

शिर्डी शहरात सुद्धा वेगळी परिस्थिती नाही.इथे सुद्धा प्रस्थापितांविरुद्ध विस्थापित अशीच लढाई आहे.ती आपण सर्वांनी एकजुटीने,एकदिलाने लढायची आहे.असा विश्वास यावेळी प्रवेश केलेल्या सर्व तरुणांनी व्यक्त केला. गोर-गरिबांचा,सर्व-सामान्यांचा,दिन-दुबळ्यांचा,कामगारांचा,बेरोजगारांचा,शेतकऱ्यांचा,वंचितांचा आवाज म्हणजे काँग्रेस आहे. कुठल्याही हेतू शिवाय निःस्वार्थ पणे विश्वासाने प्रवेश केलेल्या तरुणांना योग्य न्याय तसेच मान-सन्मान दिला जाईल.

यावेळी योगेश प्रकाश गायके, ॲड.अविनाश कैलास शेजवळ,सामाजिक कार्यकर्ते समीर शेख,गुड्डू शेख यांच्यासह महावीर धुताडमल,अमोल धुताडमल,शिवाजी भोंडगे,हरीश शीलावंत,योगेश निरभावणे,आदित्य आरणे, विशाल अहिरे,ईश्वर भोंडगे,इरफान पठाण,भूषण आरने आदींसह अनेक तरुण कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

यावेळी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव प्रसाद शेळके,युवक काँग्रेस शहराध्यक्ष अमृत गायके,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उमेश शेजवळ,माजी नगरसेवक सुरेश आरणे,युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मदन मोकाटे,काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मोसिन सय्यद,मोसिन खान,मंगेश खाकाळे,एनएसयूआयचे तालुकाध्यक्ष स्वराज त्रिभुवन,शहर उपाध्यक्ष अरबाज कादरी,आसिफ शेख, शहर संघटक राजू बरडे, शिर्डी शहर युवक काँग्रेसचे सचिव कृष्णा गायकवाड,भूषण आरणे,योहान गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here