मुंबई (विशेष प्रतिनिधी) – मंत्रालय मुंबई येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण व राज्याचे जलसंपदा मंत्री ना जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तापी नदीवरील खेडी-भोकरी येथे मोठ्या पुलाचे बांधकाम सुरुवात लवकरात करण्यात यावी तसेच निम्न तापी प्रकल्पाचा PMKSY योजनेत समावेश करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला बैठकीस चोपड्याच्या आ.लताताई सोनवणे, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, मा.आ.चंद्रकांत सोनवणे बांधकाम सचिव श्री.जोशी जलसंपदा सचिव श्री.छाहाल, बांधकाम मंत्री यांचे खाजगी सचिव श्रीकांत देशपांडे तापी पाटबंधारे कार्यकारी संचालक श्री.कांबळे, अधिक्षक अभियंता पि.पि.सोनवणे, व्हि.डी.पाटील आणि प्रमोद बऱ्हाटे उपस्थित होते.







