यावल (सुरेश पाटील) – यावल तालुक्यातील इयत्ता १० वीचा निकाल हा समाधान कारक लागला आहे. अनेक ठिकाणी स्मार्टच्या माध्यमातुन ऑनलाइन निकाल पाहण्यात आला. मुलींची सर्वचं विभागात आघाडी दिसुन येत आहे.शहरात सरस्वती विद्यामंदिराचा निकाल ९५.५३, माध्यमिक कन्या शाळा ८७.६९, साने गुरूजी विद्यालय ८४.२८, बाल संस्कार शाळा १००, डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल ९२.५७, मुलींचे िवकास विद्यालय ९७, इंदिरा गांधी गर्ल्स हायस्कुल १००, पी.एस.एम.एस.स्कूल बामणोद ८१.७०, दिवाकर खंडू चौधरी विद्यालय डांभुर्णी ९४.८०, माध्यमिक विद्यालय वड्री ९५.२४, काशीराम विद्यालय आमोदे ८६.५४, माध्यमिक विदयालय शिरसाड ८६.२०, ज्योती विदया मंदिर सांगवी ९७.०१, चुंचाळे विद्यालय ९३, श्री भुवनेश्वरी विद्यामंदिर मनवेल ९७.२२, उर्दु स्कुल भालोद १००, न्यू इंग्लिश स्कूल भालोद ९६.७० असे निकाल लागले आहे
शहरातील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा परीक्षेचा निकाल ९५.५३ टक्के लागला असुन एकूण ११२ प्रवीष्ठ विद्यार्थी पैकी १०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले यात ९५.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक कल्पेश मोहनदास सोनार ९५.६० याने पटकावला तर द्वितीय मनीष ज्ञानेश्वर पाटील ९२.४०,द्वितीय कुंदन संतोष तायडे ९२.४०, तर तृतीय भूषण प्रवीण कुयटे ९१.२० टक्के गुण मिळवले तेव्हा सर्व उर्तीण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष रमण देशपांडे, उपाध्यक्ष अरुण कुळकर्णी, सर्व संचालक मंडळ,मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
कन्या शाळा
शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयाचख निकाल हा ८७.६९ टक्के लागला आहे यात प्रथम क्रमांक वैशाली दयाराम जयकारे ९२.00 टक्के, द्वितीय तेजश्री अनिल पाटील ९१.४०,तृतीय कीर्ती तेजपाल पाटील ९१.२०,चतुर्थ शशिकांत सखाराम चौधरी कन्या स्नेहल निलेश बडगुजर ९०,पाचवा क्रमांक देवयानी लक्ष्मण पाटील ८९ असे आहे या सर्व गुणवंत्ताने स्थेचे चेअरमन मनीष चौधरी, अध्यक्ष चंद्रकांत चौधरी सह शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे कडून अभिनंदन केले जात आहे.
साने गुरूजी विद्यालय.
साने गुरुजी विद्यालयाचा निकाल ८४.२८ टक्के लागला आहे. यात विद्यालयातून प्रथम साने गुरूजी रिजवान रमजान पटेल ९४.०४, द्वितीय पवन ज्ञानेश्वर सोनवणे ९१.८० तर युगंधरा अजय शिंदे ही ९१.४० टक्के गुण मिळवत तृतिय आली आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष नौशाद तडवी शाळेच्या समितीचे अध्यक्ष अतुल पाटील तसेच शिक्षण समितीच्या सभापती रूख्माबाई भालेराव सह सर्व संचालक मंडळ आणि शाळेचे मुख्याध्यापक सुरेश वाघ यांनी अभिनंदन केले आहे.
बाल संस्कार विद्यालय.
बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाचा शालांत परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे यात प्रथम भाग्यश्री गोविंद वाणी ९१.८०,द्वितीय अभिराम दिलीप बुरूजवाले ९१.६० व तृतीय क्रमांक ऐश्वर्याा महेश वाणी ८९.६० हिने मिळवला ऊत्तीर्ण झाला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी, संचालक मंडळ, मुख्याध्यापिक ए.एम. गर्गे, एल. व्ही. चौधरी, एन. ए. बारी, एस. डी. देशमुख सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
डॉ. जाकीर हुसून उर्दु हायस्कुल.
शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल चा निकाल ९२.५७ टक्के लागला आहे एकूण १७५ विद्यार्थी होते त्यातील १६२ विद्यार्थींनी यश संपादन केले आहे यामध्ये प्रथम नाझिया राजु पटेल ९१.६०,द्वितीय अफसर युनूस तडवी ९०.४० व तृतिय मोईज अहेमद खान खलील खान ८९.४० आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन हाजी ताहेर शेख व प्राचार्य रहीम राजा यांनी अभिनंदन केले आहे.
मुलींचे विकास विद्यालय.
गुरूमाई शिक्षण मंडळ संचलित मुलींचे विकास विद्यालयाचा निकाल ९७ टक्के लागला आहे यात प्रथम तनुजा जितेंद्र देशमुख ८१.६०, व्दितीय ममता बाळकृष्ण महाजन ८१.६०, तृतीय वैष्णवी संजय कचरे ७७, व चतुर्थ मृणालीनी बाळु भालेराव ७६ उर्तीण झाली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थींनीचा संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश चौधरी सह मुख्यध्यापक, शिक्षिक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे कडून अभिनंदन केले जात आहे.
इंदिरा गांधी गर्ल्स हायस्कुलचा
इंदिरा गांधी गर्ल्स हायस्कुलचा निकाल हा १०० टक्के लागला आहे यात प्रथम सैय्यद महवरा आसीक हुसेन ९१.४०, व्दितीय नेहरीन फातेमा गुलामगौस खान ८९.८० तर तृतिय महेजबीन असलम खान ८९.६० क्रमांकाने उर्तीण झाली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थींनीचा संस्थेचे अध्यक्ष हाजी ताहेर शेख चॉद, चेअरमन मुस्तुफा खान मुख्यध्यापिका सैय्यद मुमताज सह शिक्षिक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे कडून अभिनंदन केले जात आहे.
पी.एस.एम.एस.स्कूल बामणोद.
पी.एस.एम.एस.स्कूल बामणोद चा निकाल ८१.७० लागला आहे यात प्रथम यशस्वीनी विजय इंगळे ९२.८०, द्वितीय पूर्वा नितीन झांबरे ८४.८०,तृतीय हिमाली दिलीप बोरोले ८३ असे उर्तीण झाले आहे तेव्हा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे, चेअरमन डाॅ.जे.डी.भंगाळे, सेक्रेटरी पुंडलिक नेमाडे व मुख्याध्यापक नरेंद्र ससाणे सह संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
डॉ. दिवाकर खंडू चौधरी विद्यालय डांभुर्णी.
नवयुवक विद्याप्रसारक मंडळ डांभुर्णी संचालित डाॅ. दिवाकर खंडू चौधरी विद्यालय डांभुर्णी या शाळेचा निकाल ९४.८० लागला यात प्रथम मोनाली रविंद्र निळे ८८, व्दितीय रूपाली वासुदेव सपकाळे ८६.८०, तृतिय खगेश राजाराम खर्चे ८६ आला आहे तेव्हा सर्व यशस्वी विध्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष डाॅ. विवेक दिवाकर चौधरी, उपाध्यक्ष सोनू भंगाळे, सेक्रेटरी मधुकर सरोदे सह सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक उमाकांत महाजन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारींनी अभिनंदन केले आहे.
माध्यमिक विद्यालय वड्री
तालुक्यातील वड्री येथील माध्यमिक विद्यालयाचा निकाल हा ९५.२४ टक्के लागला आहे. यात प्रथम तनुजा युनूस तडवी ७५.६०, व्दितीय सायमा शब्बीर तडवी ७४, तृतिय यश संजय चौधरी ७३.८० आला आहे तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्यध्यापक जयंत चौधरी, के. जी. चौधरी, जे. जी. चौधरी, एस. व्हि. पाटील, सुनंदा सरोदे, पी. एन. राणे, जी. के. पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्रा. व्ही. पी. चौधरी आदींनी अभिनंदन केले आहे.
घनश्याम काशीराम विद्यालय आमोदे
आमोदे शिक्षण प्रसारक मंडळ आमोदे संचलित घनश्याम काशीराम विद्यालय आमोदे या शाळेचा निकाल ८६.५४ लागला आहे यात प्रथम भूमिका ललित पाटील ९२.२०, व्दितीय प्राची संतोष भंगाळे ८४, तृतीय वैष्णवी प्रसन्न पाटील ८२.२० तर मुलांमध्ये प्रथम शुभम विलास तायडे ८१.८० सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष उमेश प्रभाकर पाटील, चेअरमन सुभाष महाजन, चिटणीस महेंद्र सरोदे व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस. बी. बोठे सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे आहे.
माध्यमिक विदयालय शिरसाड
माध्यमिक विदयालय शिरसाड शाळेचा निकाल ८६.२० लागला आहे यात प्रथम देवयानी अजय बडगुजर ९१.४०, द्वितीय हर्षाली प्रभाकर वानखेडे ८७.२०, तृतीय तेजस्विनी रामा ओातारी ८१.४० असे आले आहे तर सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष , पदाधिकारी व मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
ज्योती विदया मंदिर सांगवी.
सांगवी बुद्रूक येथील ज्योती विदया मंदिर ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री डाँ. भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविदयालयाचा निकाल ९७.०१ लागलेला आहे. त्यात प्रथम संजना प्रमोद नेमाडे ८८.२०, द्वितीय खुशी कमलाकर महेश्री ८४.०० तर तृतीय वसुधा चंद्रकांत वायकोळे ८३.४० आली आहे सर्व गुणवंत विदयार्थांचे संस्थेचे पदाधिकारी व कार्यकारी मंडळाने कौतुक केले आहे.
चुंचाळे विद्यालय
चुंचाळे ता. यावल येथिल समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक विद्यालयाचा निकाल हा ९३ टक्के लागला आहे यात प्रथम क्रिश प्रमोद चौधरी ८८, स्नेहा संतोष सावळे ८७.४०,तृतिय नफिसा सुभान तडवी व निशा सुकदेव कोळी दोघींना ८४.८० टक्के मिळालेत यशस्वी सर्व विद्यार्थांचे शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चौधरी, उपाध्यक्ष साहेबराव पाटील, सचिव जगन्नाथ कोळी, प्राचार्य व्ही. जी. तेली सह सर्व शिक्षक-शिक्षिका,वसतीगृह अधिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
श्री भुवनेश्वरी विद्यामंदिर मनवेल
श्री भुवनेश्वरी विद्यामंदिर मनवेल या शाळेचा निकाल ९७.२२ टक्के लागला असुन यात प्रथम प्राची मच्छिंद्र पाटील ९०.४०, द्वितीय नंदिनी ज्ञानेश्वर पाटील ८८, तृतीय वैष्णवी भरत पाटील ८६.८० चतुर्थ वैष्णवी विकास ठाकूर ८४.८० तर पाचवा क्रमांक नेहा फुलसिंग चौधरी ८४.४० हिने मिळवला तर या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष गोपाल पाटील, सचिव अरुण कालूसिंग पाटील सह सर्व कार्यकारी मंडळ सदस्य, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
हज्जन कुलसम बी उर्दु स्कुल भालोद
हज्जन कुलसम बी उर्दु स्कुल भालोद चा निकाल १०० टक्के लागला आहे यात प्रथम गुलनाज बानो जाकीर शाह ८६.८०, व्दितीय अन्जूमबी कलीम मन्यार ८६, तृितय मुस्कानबी सय्यद मकसूद ८२.८० आली आहे तेव्हा या सर्वांचे संस्थाध्यक्ष डॉ. साबीर खान समशेर खान, मुख्यध्यापक इम्रान खान सचिव जाबीर खान आदींनी अभिनंदन केले आहे
न्यू इंग्लिश स्कूल भालोद
न्यू इंग्लिश स्कूल भालोद चा निकाल ९६.७० लागला आहे यात प्रथम प्रणिता सुनील परतणे ९१.२०, व्दितीय प्रियांशु संजीव चौधरी ९०.२०, तृतिय यतीश जनार्दन बडगुजर ८९.६० असा आला आहे तेव्हा या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक मंडळ, मुख्यध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
अन्जुमन ए इस्लाम उर्दू हायस्कूल साकळी
सर सय्यद एज्युकेशन सोसायटी साकळी संचलित अंजुमन इस्लाम उर्दू हायस्कूल साकळीचा निकाल ९५.५०लागला असून यात प्रथम इशरत अन्जुम शेख असलम ९२.४०, व्दितीय आरिज खानम साबीर खान ८८.६०, तर तृतिय महेक अन्जुम अब्दुल खालीक ८८ आली आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे उपाध्यक्ष नूरोद्दीन हाजी शफीयोद्दीन, उपाध्यक्ष सय्यद अहमद सय्यद हाजी मिरा,चेअरमन हाजी निसार खान हाजी महेमुद खान, सरचिटणीस के बी खान, शाळेचे प्राचार्य मोहम्मद हनीफ खान व संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि समस्त स्टॉफ ने अभिनंदन केले आहे.







