बॉलिवूडचा सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी याने केले आहे शूट
मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर सक्रिय असते. गेल्या अनेक दिवसांपासून जॅकलिन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. आता जॅकलिन एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.
जॅकलिनचा हा फोटो बॉलिवूडचा सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी याने काढला आहे. अनेक अभिनेत्री डब्बू रतानानीच्या फोटो शूटमुळे चर्चेत येतात. त्याच कारण म्हणजे त्यांचे टॉपलेस फोटो आहे. यावेळी जॅकलिनने देखील टॉपलेस फोटो काढला आहे.
या फोटोत जॅकलिनचा हॉट आणि बोल्ड अंदाज दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘रोज सकाळी लवकर उठा. कारण जेव्हा इतर स्वप्न बघत असतील तेव्हा तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्ग शोधत असाल,’ अशा आशयाचे कॅप्शन डब्बू रतनानीने दिले आहे.






