पद्म पुरस्कारांसाठी नामांकन पाठवण्याचे पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रतिष्ठित पद्म सन्मान पुरस्कारासाठी नामांकन करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केले आहे की, समाजासाठी विशेष योगदान दिलेली माणसे तुम्हाला माहिती असेल तर त्यांना पद्म पुरस्कारासाठी नामांकीत करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विटरद्वारे लोकांना हे आवाहन केले आहे. पद्म पुरस्कारासाठी नामांकन देण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मोदी सरकारने अनेक क्षेत्रातील कामगिरी आणि त्यांच्या योगदानाबद्दल पद्म पुरस्काराने शेकडो असंख्य नायकांचा गौरव केला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, देशात अशी अनेक माणसं आहेत जी आपल्या मुळांशी जोडली असून विशेष काम करत आहे. त्यांच्या कामाचा फायदा समाजाला होत आहे. परंतु, आम्हाला त्यांच्याबद्दल फारच कमी माहिती आहे. आपण अशा लोकांना ओळखता का? तर तुम्ही त्यांना #PeoplesPadma (लोकांचा पद्म सन्मान) म्हणून नामांकित करा. अशा लोकांची नावे 15 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पाठवता येईल.

पद्म पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. दरवर्षी देण्यात येणारा हा पुरस्कार तीन प्रकारात दिला जातो. 1954 मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार देणाऱ्यांची नावे जाहीर केली जातात. नामांकन लोक करतात. पात्र व्यक्ती स्वतःचं नावही नामांकीत करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here