लोणावळ्यात चार पर्यटकांवर गुन्हा; मद्याच्या नशेत टोळक्याने फोडल्या वाहतूक पोलीस चौकीच्या काचा

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पुणे – मुंबई-पुणे महामार्गावर मद्याच्या नशेत भरधाव मोटार चालवणे तसेच सार्वजनिक ठिकाणी धुडगुस घालणाऱ्या चार पर्यटकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मद्याच्या नशेत टोळक्याने वाहतूक पोलिसांच्या चौकीच्या काचा फोडल्या असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

गणेश संभाजी साळवे (वय २४), सुनीत संभाजी साळवे (वय २२), नवनाथ संभाजी साळवे (वय ३०, रा. नाणेकरवाडी, चाकण-तळेगाव रस्ता, जि. पुणे), रामदास बबन औटे (वय ३०, रा. गणेगाव, शिरूर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या पर्यटकांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार नितेंद्र कदम यांनी यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावरून आरोपी साळवे, औटे भरधाव वेगाने मोटारीतून निघाले होते. लोणावळ्यातील एवन चिक्की चौकात त्यांनी मोटार थांबवून गोंधळ घातला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुमार चौकात मोटार अडवली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. मोटारचालक नवनाथ साळवेने मद्या पिल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन वाहतूक पोलिसांच्या चौकीत आणले. त्या वेळी गणेश साळवेने चौकीची काच फोडली. आरोपींनी चौकीत गोंधळ घातला. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराज पाटणकर तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here