पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : कुख्यात गुंड पप्पू वाडेकर याचा पुण्यात खून करण्यात आला आहे. कुख्यात गुंड पप्पू वाडेकर याने पुणे शहरात दहशत माजवलेली होती. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमधील एका हॉटेलमध्ये खंडणी मागून खुनी हल्ला केल्याचा राग होता. या रागातून कुख्यात गुंड पप्पू वाडेकर याचा मालक मिलिंद जगदाळे व त्याच्या अन्य पाच साथीदारांनी पप्पूचा काटा काढल्याचा अंदाज पोलिस निरीक्षक सतिश गुरव यांनी वर्तवला आहे.
विविध प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग असलेला तडीपार गुंड पप्पू कल्याण वाडेकर गुंडाचा खून झाल्याने शहरात मोठी खळबळ माजली आहे. पप्पू वाडेकरवर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे विविध प्रकारचे ९ गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या म्हणून त्याच्या विरोधात खेड पोलिसांनी शिफारस केल्यानुसार त्याला खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातून सहा महिने तडीपार करण्यात आले होते.






