पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट करा :- प्रकाश भैय्या गायकवाड

महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेची पोलीस अधीक्षक यांच्याकङे मागणी

सातारा (सोमनाथ जाधव) – कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्य़ातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व होमगार्डस् यांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट करावी त्यामुळे त्यांच्या आरोग्याचीही खबरदारी घेतली जाईल अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख मा.प्रकाश भैय्या गायकवाड यांनी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅङम यांच्या कङे पत्रा द्वारे केली आहे ते म्हणाले सध्या जिल्हात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात थैमान सुरू आहे तसेच कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी आणी उपाय योजनेसाठी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच होमगार्डस् राबता सूरू आहे यातुन काही पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे या संसर्गाने पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू सुद्धा झाला आहे त्यामुळे एकमेकांच्या संसर्गातून अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांही धोका होऊ शकतो नागरीकांच्या संपर्कातून याचा फैलाव होऊ शकतो या साठीच सर्वच पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व होमगार्डस् यांची रॅपिङ अ‍ॅन्टिजन टेस्ट करून घ्यावी त्यामुळे कोणाला कोरोनाची लागण झाली असल्यास ते निदर्शनास येईल व वेळीच उपचार होऊन त्यांच्या जिवीतावर बेतणार नाही असे महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख मा. प्रकाश भैय्या गायकवाड यांनी म्हटले आहे ….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here