मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्यात आयोजित एका कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांसमोर आपल्यावर आयबी कडून पाळत ठेवली जात असल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर करण्यात आला होता.
त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नवाब मलिक यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची पाळत ठेवण्यात आली नसल्याचं सांगितलं आहे. तसेच नाना पटोले यांनी माहितीच्या अभावी असा आरोप केला आहे, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
आज मुंबई मध्ये नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर आपलं मत नोंदवलं.







