सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देय थकीत रक्कम राखीव वेतन निधीतून देणेच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रयत्न करणार – उपनगराध्यक्ष तानाजी पोवार

कोल्हापूर (सहसंपादक मनोज सोनवले) : इचलकरंजी नगरपरिषदेत सेवानिवृत्त झालेल्या १२५ कर्मचाऱ्यांची उपदान (ग्रॅज्यूईटीची रक्कम) गेल्या दोन वर्षापासून प्रलंबीत आहे.तसेच दोनशे पेक्षा जादा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रजेची रक्कमही अजून मिळाली नाही. सफाई कामगारांच्या सुटीच्या पगाराचा मोबदला गेल्या एक वर्षापासून मिळाला नाही. याबाबतचे निवेदन सेवानिवृत्त कर्मचारी तसेच इचलकरंजी नगरपरिषदेकडून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे.सदर प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे.

नगरपरिषदेकडून ठेवलेल्या राखीव निधीची रक्कम सुमारे १६ ते १७ कोटी रूपये इतकी आहे. सदर राखीव वेतन निधी तरतूदीच्या केवळ व्याज रकमेतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देय रक्कम भागवता येवु शकते. नगरपालिकेने वेतन राखीव निधी सुरक्षित ठेवल्याची बाब नक्कीच महत्वाची व कौतुकास्पद आहे. सदर रक्कमेच्या केवळ व्याजातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची रक्कम अदा करणेसाठी कर्मचारी यांची आग्रही मागणी आहे.

ichalkaranji1

त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचे वेतन सुद्धा गेल्या एक वर्षापासून प्रलंबीत असून ती रक्कम पण यातून मिळावी अशा आशयाचे निवेदन उपनगराध्यक्ष रवि रजपुते यांनी इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद.भा.ज.पा तानाजी पोवार यांना दिले होते..या अनुषंगाने आज सोमवार दि.१२ जुलै रोजी मुख्याधिकारी.डॉ.प्रदीप ठेंगल व लेखापाल सौ.कलावती मिसाळ यांच्या समवेत उपनगराध्यक्ष दालनात बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीत मा.उपनगराध्यक्ष रवि रजपुते यांनी कर्मचाऱ्यांच्या मागणी दिलेल्या निवेदनांनुसार प्रस्तुतपणे उपस्थित केली. यावेळी झालेल्या चर्चेस अनुसरून याप्रश्नी नगर परिषदेकडून सादर करणेत आलेला प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणेचा निर्णय करणेत आला. याकरिता उद्या दि.१३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यासन ११ येथे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांची प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी. .हेमंत निकम यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे..

ichalkaranji-meeting

इचलकरंजी नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देय थकीत रक्कम राखीव वेतन निधीतून देणेसाठी लागेल तो पाठपुरावा करून लवकरांत लवकर हा प्रश्न निकाली काढणार,अशी आश्वासक ग्वाही उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी दिली. या आढावा बैठकीस नगरसेवक प्रकाश पाटील, मा.उपनगराध्यक्ष रवि रजपुते, कामगार नेते राजेश रजपुते, कर्मचारी शिष्टमंडळात रविंद्र लोखंडे..बाळू तिवडे..भगवान भावे..विलास बंडगे..सुरेश साठे..सौ.सुलोचना गुळगे…सरदार सावंत..उमाजी भोरे..रंगराव लाखे..बबन कांबळे..सौ.परमती कांबळे..सौ.उमा चव्हाण..राजू कांबळे..सुभाष कांबळे…बाबासो कांबळे..सौ.शोभा कांबळे..सौ.शांता जावळे..सौ.सुमन जावळे..दयानंद कांबळे..अल्लाउद्दीन कादरभाई.. .प्रकाश कुऱ्हाडे.. मारुती गायकवाड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here