शिवसेना शिवसंपर्क अभियानास जोरदार प्रतिसाद वारुळ, मुडावद, खलाणे,चिमठाणे येथे बैठका संपन्न

शिंदखेडा (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात सन 2022 मध्ये होऊ घातलेल्या नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून शिवसेना शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून या अभियानाची सुरुवात दिनांक 12 जुलैपासून बेटावद गटातील वारूळ गणातून श्री महादेव मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. खलाने, मुडावद, चिमठाणा येथेही बैठका घेण्यात आल्या. त्यासह शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

शिवसंपर्क अभियाना बद्दल सविस्तर माहिती देताना श्री.साळुंके म्हणाले की, गावागावातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक शिवसेना कार्यकर्ते यांच्या अडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी हे अभियान आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी कोरोना काळातील घेतलेले निर्णय, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेतले आहे. असे असले तरी राज्याचा हिश्‍श्‍याचे जीएसटी कराचे पैसे हे केंद्राकडे बाकी आहे. ती रक्कम महाराष्ट्राला मिळाल्यास अजून चांगल्या प्रकारे विविध योजनांद्वारे शेतकरी, गोरगरीब यांना लाभ देता येईल.

कोरोनाचा तिसरा लाटेची शक्यता लक्षात घेता ‘माझे गाव कोरोनामुक्त गाव’ हे अभियान प्रत्येक गावात राबवायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गावात दक्षता समिती समिती स्थापन करावी. या समितीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरात जाऊन लसीकरण झाल्याची खात्री करावी. जेणेकरून कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपवता येईल. पाऊस पडला नसल्याकारणाने राज्यात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून त्याबाबत कृषी मंत्री ना. भुसे यांना सूचना दिल्या आहेत. यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विविध कामांची माहिती व घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयाची माहिती उपस्थितांना श्री. साळुंके यांनी दिली.

shindkheda-shivsena

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, विधानसभा संघटक गणेश परदेशी, उपजिल्हा संघटक, भाईदास पाटील, तालुका संघटक डॉ. मनोज पाटील, शिंदखेडा शहरप्रमुख संतोष देसले, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, युवा सेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप पवार, स्थानीय लोकाधिकार समितीचे हिरालाल बोरसे, माजी उपसभापती विनोद बोरसे, अमोल चौधरी, अमोल भदाणे, मनोज शिंपी, समाधान बदाणे, साहेबराव पाटील, अशोक पाटील उपस्थित होते.

शिव संपर्क अभियानाची दुसरी बैठक मुडावद येथे महादेव मंदिराच्या आवारात घेण्यात आली. यावेळी भडणे विठ्ठल ट्रस्टचे मनोहर देसले, मनोहर निकम, सरपंच खंडारे, विभागप्रमुख नंदू दोरीक, एसटी कामगार सेनेचे विनोद धनगर, तुंबडू चौधरी, निंबा निळे, लक्ष्मण दोरिक, भिकन शिरसाठ, सुनील कोळी, सुभाष पाटील, अधिकार दोरीक, छोटू दोरीक, राजू माळी उपस्थित होते.

शिव संपर्क अभियाना ची तिसरी बैठक वाघाडी येथील श्री दत्त मंदिर येथे पार पडली. कार्यक्रमाचे तालुका संघटक डॉ.मनोज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसंपर्क अभियान कार्यक्रमाची चौथी बैठक खलाणे येथील ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. तत्पूर्वी गावात प्रस्तावित असलेल्या आर.ओ.वाटर प्लांट कामाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच रत्‍नाबाई भिल, उपसरपंच संजय वाल्हे, नाना पाटील, रावसाहेब देसले, सचिन वाघ, प्रकाश वाघ, डॉ. गिरासे, तनु देसले, रामू भिल, गटप्रमुख परमेश्वर पाटील, राहुल वाल्हे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here