मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) : महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या वाढदिवसाचे (१२ जुलै) औचित्य साधून गोरेगाव पूर्व विभागात घासबाजार येथे असलेल्या लसीकरण केंद्रात आज जास्तीत जास्त दिव्यांगांना लस देण्यात आली.
मागील दोन महिन्यांपासून येथे रोजच सामान्य नागरिकांना तसेच दिव्यांगना प्रथम प्राधान्य देऊन लसीकरण करण्यात येते.स्थानिक नगरसेविका साधनाताई माने व कर्तव्यदक्ष शाखाप्रमुख अजित भोगले यांच्या पुढाकाराने विभागात सुरू करण्यात आलेल्या या लसीकरण केंद्रामुळे आमची जवळच लसीकरणाची सोय झाली आहे.असे नागरिकांनी सांगितले. तसेच सर्व स्थानिकांनी शिवसेनेचे आभार व्यक्त केले.

या वेळी लसीकरण केंद्रात प्रामुख्याने नगरसेविका साधनाताई माने, शाखाप्रमुख अजित भोगले, महिला शाखा संघटक शीला राठोड, रवी वर्मा, जितेंद्र महाडिक ,चेतन सरपरे , लक्ष्मी गमरे,व सर्व शिवसैनिक आणि डॉ अजय चव्हाण,डॉ सृष्टी आदी मान्यवर उपस्थित होते.






